यु.एस.एस. लेक्झिंग्टन
यु.एस.एस. लेक्झिंग्टन नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या.
खऱ्या नौका:
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (१७७६) - इ.स. १७७६मध्ये विकत घेतलेली ब्रिगॅंटाइन प्रकारची नौका.
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (१८२५) - इ.स. १८२६-इ.स. १८३० आणि इ.स. १८३१-इ.स. १८५५ या कालखंडात कार्यरत असलेली स्लूप प्रकारची नौका.
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (१८६१) - इ.स. १८६१-इ.स. १८६५ या कालखंडात कार्यरत असलेली युद्धनौका.
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (सीव्ही-२) - इ.स. १९२७ मध्ये तयार केलेली आणि इ.स. १९४२ मध्ये कॉरल समुद्राच्या लढाईत बुडलेली विमानवाहू नौका.
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (सीव्ही-१६) - इ.स. १९४३-इ.स. १९९१ या कालखंडात कार्यरत असलेली युद्धनौका.
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन २ (एसपी-७०५) - इ.स. १९१७-इ.स. १९१८ या कालखंडात कार्यरत असलेली गस्तीनौका. याचे नाव नंतर यु.एस.एस. एसपी-७०५ असेही होते.
काल्पनिक नौका:
- स्टार ट्रेक:
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (एनसीसी-१७०९) - १९६८ च्या द अल्टिमेट कम्प्युटर या भागात दिसलेले कॉन्स्टिट्युशन प्रकारचे अंतराळयान.
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (एनसीसी-१४४२७) - १९९४ च्या धाइन ओन सेल्फ या भागात दिसलेले एक्सेल्सियर प्रकारचे अंतराळयान.
- यु.एस.एस. लेक्झिंग्टन (एनसीसी-६१८३२) - १९९५ च्या एक्सप्लोरर्स या भागात दिसलेले नेब्युला प्रकारचे अंतराळयान.