Jump to content

युव्हेन्तुस एफ.सी.

युव्हेन्तुस
पूर्ण नाव युव्हेन्तुस फुटबॉल क्लब S.p.A.
टोपणनाव ला व्हेच्चिया सिन्योरा
स्थापना नोव्हेंबर १, इ.स. १८९७
मैदान युव्हेन्तुस स्टेडियम
तोरिनो, इटली
(आसनक्षमता: ४१,०००)
लीग सेरी आ
२०११-१२ विजेते
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

युव्हेन्तुस फुटबॉल क्लब (इटालियन: Juventus F.C.) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८९७ साली प्यिमॉंत प्रदेशामधील तोरिनो शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो. स्थापनेपासूनचे २००६-०७चा अपवाद वगळता सर्व हंगाम सेरी आ मध्येच खेळणारा युव्हेन्तुस हा इटलीमधील व जगातील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. युव्हेन्तुसने आजवर २८ वेळा सेरी आ चे, २वेळा युएफा चॅंपियन्स लीगचे व ३ वेळा युएफा युरोपा लीगचे अजिंक्यपद मिळवले आहे. आजवर युव्हेन्तुसने इटालियन फुटबॉल संघामध्ये सर्वाधिक खेळाडू पाठवले आहेत.

बाह्य दुवे