Jump to content

युलिया तिमोशेन्को

युलिया तिमोशेन्को

युक्रेनची पंतप्रधान
कार्यकाळ
१८ डिसेंबर २००७ – ४ मार्च २०१०
राष्ट्रपती व्हिक्टर युश्चेन्को
व्हिक्तोर यानुकोव्हिच
मागील व्हिक्तोर यानुकोव्हिच
पुढील मिकोला अझारोव

जन्म २७ नोव्हेंबर, १९६० (1960-11-27) (वय: ६३)
द्नेप्रोपेत्रोव्स्क, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ

युलिया व्होलोदिमिर्ना तिमोशेन्को (युक्रेनियन: Ю́лія Володи́мирівна Тимоше́нко; २७ नोव्हेंबर १९६०) ही पूर्व युरोपातील युक्रेन देशाची माजी पंतप्रधान आहे. इ.स. २००५ साली अल्प काळाकरिता व २००७ ते २०१० दरम्यान ती युक्रेनच्या पंतप्रधानपदावर होती. तिमोशेन्कोचा युक्रेनच्या युरोपियन संघामध्ये प्रवेश करण्याला तीव्र पाठिंबा आहे.

ऑक्टोबर २०११ मध्ये पंतप्रधान असताना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तिमोशेन्कोवर खटला भरण्यात आला व तिला ७ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. सध्याच्या घडीला ती अटकेत असून खार्कीव्ह येथील एका इस्पितळामध्ये पाठीच्या विकारावर उपचार घेत आहे. तिला झालेली शिक्षा ही पूर्णपणे राजकीय सूडभावाने दिली गेली आहे असा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा दावा आहे. युरोपियन संघाने तिला सोडली जावे ही मागणी युक्रेनियन सरकारकडे अनेकदा केली आहे.

२०१५ साली होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी तिमोशेन्कोच्या राजकीय पक्षाने तिला आघाडीचा उमेदवार म्हणून उभे केले आहे.

बाह्य दुवे