Jump to content

युलिप (गुंतवणूक योजना)

युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (इंग्लिश: Unit-linked insurance plan) हे भारतामधील गुंतवणूकीचे एक माध्यम आहे. ह्यामध्ये विम्याच्या प्रिमियमची रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते व म्युचुअल फंडाच्या मुल्यासोबत विमाचे मुल्य वाढते (किंवा कमी होते). विमा व गुंतवणूक ह्यांचे मिलन युलिपद्वारे शक्य आहे.

परंतु विमा व गुंतवणूक हे वेगळेच ठेवावेत असे जाणकारांचे व युलिपच्या टीकाकारांचे स्पष्ट मत आहे. युलिप पॉलिसीच्या पहिल्या काही वर्षांमध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणावर फी आकारतात. त्यामुळे युलिपमधून मिळणारे रिटर्न्स फसवे आहेत असा साधारण दावा आहे.

भारतातील बहुतेक सर्व सरकारी व खाजगी विमा कंपन्या (एलआयसीसह) युलिप उत्पादने विकतात.