युरोलॉट
युरोलॉट एस.ए. ही पोलंडच्या वॉर्सो शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीची स्थापना लॉट पोलिश एरलाइन्स या कंपनीची उपकंपनी म्हणून झाली होती. सध्या पोलंड सरकारकडे याची ६२.१% मालकी आहे तर लॉट कडे ३७.९%. ही कंपनी लॉटच्या छोट्या पल्ल्याच्या फ्लाइटांवर सेवा पुरवते.[१][२] याशिवाय ही कंपनी विविध चार्टरसेवाही पुरवते. या सेवा मुख्यत्वे वॉर्सोच्या फ्रेडरिक चॉपिन विमानतळ, क्राकोवच्या जॉन पॉल दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच ग्डान्स्कच्या लेक वालेंसा विमानतळावरून असतात.[३]