युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९१९ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या बँकेची ६३.४४% मालकी भारत सरकारकडे आहे. या बँकेकडे १३.४५ अब्ज अमेरिकन डॉलरची मालमत्ता आहे. या बँकेचे उद्घाटन म. गांधीजींच्या हस्ते ११ नोव्हेंबर १९१९ला झाले.