Jump to content

युनायटेड किंग्डमचा आठवा एडवर्ड

आठवा एडवर्ड

कार्यकाळ
२० जानेवारी १९३६ – ११ डिसेंबर १९३६
पंतप्रधान स्टॅन्ली बाल्डविन
मागील पाचवा जॉर्ज
पुढील सहावा जॉर्ज

जन्म २३ जून १८९४ (1894-06-23)
सरे, इंग्लंड
मृत्यू २८ मे, १९७२ (वय ७७)
पॅरिस, फ्रान्स
सही युनायटेड किंग्डमचा आठवा एडवर्डयांची सही

आठवा एडवर्ड (इंग्लिश: Edward Albert Christian George Andrew Patrick David, एडवर्ड आल्बर्ट क्रिश्चन जॉर्ज अँड्र्यू पॅट्रिक डेव्हिड; २३ जून १८९४ - २८ मे १९७२) हा इ.स. १९३६ साली अल्प काळासाठी युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता.

वडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर एडवर्ड ब्रिटनचा राजा बनला. परंतु त्याला राजघराण्यासाठी आखुन दिलेले नियम व रिती मान्य नव्हत्या व तो सर्रास ह्या नैतिक नियमांचे उल्लघंन करीत असे. राजा बनल्यानंतर केवळ एका महिन्यात एडवर्डने वॉलिस सिम्पसन नावाच्या एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. सामान्य जनता एका घटस्फोटितेला आपली राणी म्हणून कधीही मान्य करणार नाही असा दावा करीत ब्रिटन व इतर राष्ट्रकुल पंतप्रधानांनी ह्याला विरोध दर्शवला. तसेच ब्रिटनचा राजा हा चर्च ऑफ इंग्लंड ह्या ब्रिटनमधील सर्वात मोठ्या धर्मसंस्थेचा प्रमुख असल्यामुळे व चर्चला हा विवाह मान्य नसल्यामुळे एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली. त्याच्या जागेवर त्याच्या धाकटा भाऊ सहावा जॉर्ज ह्यास राजसत्तेवर बसवण्यात आले.

राजेपद सोडल्यानंतर एडवर्डला विशेष महत्त्व मिळाले नाही व त्याने आपले पुढील निवृत्त जीवन पॅरिसमध्ये व्यतीत केले.


बाह्य दुवे