युटा
युटा Utah | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | सॉल्ट लेक सिटी | ||||||||||
मोठे शहर | सॉल्ट लेक सिटी | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत १३वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २,१९,८८७ किमी² | ||||||||||
- रुंदी | ४३५ किमी | ||||||||||
- लांबी | ५६५ किमी | ||||||||||
- % पाणी | ३.२५ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ३४वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २७,६३,८८५ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | १०.५/किमी² (अमेरिकेत ४१वा क्रमांक) | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | ४ जानेवारी १८९५ (४५वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-UT | ||||||||||
संकेतस्थळ | www.utah.gov |
युटा (इंग्लिश: Utah, उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले युटा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३४व्या क्रमांकाचे राज्य आहे.
युटाच्या पश्चिमेला नेव्हाडा, पूर्वेला कॉलोराडो, दक्षिणेला अॅरिझोना, उत्तरेला आयडाहो, ईशान्येला वायोमिंग तर आग्नेयेला न्यू मेक्सिको ही राज्ये आहेत. सॉल्ट लेक सिटी ही युटाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. युटामधील ८० टक्के रहिवासी ऑग्डेन-सॉल्ट लेक सिटी-प्रोव्हो ह्या शहरी पट्ट्यामध्ये राहतात. त्यामुळे ही महानगरे वगळता युटामधील इतर भागांमध्ये अत्यंत तुरळक वस्ती आहे.
युटामधील ६० टक्के नागरिक येशू ख्रिस्ताच्या आधुनिक भक्तांच्या चर्चचे अनुयायी आहेत. ह्या समुदायाला मॉर्मन (Mormon) ह्या नावाने देखील ओळखले जाते.
खुल्या हवेतील मनोरंजन क्रीडांसाठी युटा राज्य प्रसिद्ध आहे. स्कीइंग हा येथील एक लोकप्रिय खेळ आहे. खाणकाम, मीठ उत्पादन, शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
मोठी शहरे
- सॉल्ट लेक सिटी - १,८६,४४०
- वेस्ट व्हॅली सिटी (सॉल्ट लेक सिटीचे उपनगर) - १,२९,४८०
- प्रोव्हो - १,१२,४८८
गॅलरी
- अॅरिझोना व युटाच्या सीमेवरील माउंटन व्हॅली उद्यान.
- आर्चेस राष्ट्रीय उद्यान.
- युटामधील प्रमुख रस्ते.
- युटाचे विधानभवन.
- युटाचे २५ सेंट्सचे नाणे.