Jump to content

युगांतर

'युगांतर' हे एक बंगाली साप्ताहिक होते. कलकत्ता येथून ते प्रकाशित होत असे. (बांग्ला: যুগান্তর ; उच्चारण : जुगान्तर ) सशस्त्र क्रांतीच्या विचार-प्रसारार्थ हे साप्ताहिक काढण्यात आले.

प्रारंभ आणि अखेर

प्रारंभ - मार्च १९०६

अखेर - मे १९०८

संस्थापक

बारीन्द्र कुमार घोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्च १९०६ मध्ये युगांतर नावाचे क्रांतिकार्यास वाहिलेले एक नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. भगिनी निवेदिता, बारीन्द्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त यांनी याचा आराखडा निश्चित केला.[] अल्पावधीतच युगांतरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

संपादक

भगिनी निवेदिता यांच्या सुचनेनुसार या साप्ताहिकाचे भूपेंद्रनाथ दत्त हे पहिले संपादक झाले.[]

लेखक

या नियतकालिकामध्ये प्रारंभीच्या काळात श्री अरविंद घोष लेखन करत असत. त्यांचे मार्गदर्शन या नियतकालिकास लाभलेले होते.[]

संदर्भ

  1. ^ a b वि.वि.पेंडसे (१९६३). विवेकानंद-कन्या भगिनी निवेदिता. पुणे: वि.वि.पेंडसे.
  2. ^ A.B.Purani (1958). Life of Sri Aurobindo.