Jump to content

युक्रेनी वायुसेना

युक्रेनी वायुसेना युरोपच्या युक्रेन देशाच्या संरक्षण दलाचा भाग[] असून याचे मुख्यालय विनित्सिया शहरात आहे. सोवियेत संघाच्या विघटनानंतर मूळ सोवियेत वायुसेनेतील अनेक विमाने युक्रेनला मिळाली व त्यातून युक्रेनी वायुसेनेची निर्मिती झाली. त्यानंतर युक्रेनने आपल्या वायुसेनेचा आकार कमी करीत असतानाच दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यातील बहुसंख्य विमाने मूळ रशिया व सोवियेत बनावटीचीच आहेत. २०२२ च्या सुमारास युक्रेनी वायुसेनेत २२५ लढाऊ विमाने होती.[][]

विमाने

सेवारत

युक्रेनी वायुसेनेचे एसयू-२७
एसयू-२५
एमआय-८ हेलिकॉप्टर ओदेसा येथील प्रशिक्षण अकादमीच्या तळावर
विमान स्रोत प्रकार उपप्रकार सेवेत दाखल नोंदी
लढाऊ विमाने
मिग-२९ सोवियेत संघ बहुआयामी ३७ यांपैकी ८ प्रशिक्षणासाठी राखीव[]
सुखॉई एसयू-२४ सोवियेत संघ आक्रमक १२[]
सुखॉई एसयू-२५ सोवियेत संघ आक्रमक / पायदळरक्षक १७[]
सुखॉई एसयू-२७ सोवियेत संघ बहुआयामी ३२ ६ प्रशिक्षणासाठी राखीव[]
टेहळणी
अँतोनोव्ह एएन-३० सोवियेत संघ टेहळणी []
सैनिकी वाहतूक
अँतोनोव्ह एएन-२६ सोवियेत संघ सैनिकी वाहतूक २२[]
अँतोनोव्ह एएन-७० युक्रेनवाहतूक 1[]
अँतोनोव्ह एएन-१७८ युक्रेनवाहतूक ३ (मागणीवर)[]
इल्युशिन आयएल-७६ सोवियेत संघ मोठे वाहतूकविमान []
हेलिकॉप्टर
एमआय-८ सोवियेत संघ वाहतूक १५[]
प्रशिक्षण
एरो एल-३९ चेकोस्लोव्हाकियाजेट प्रशिक्षण ४७[]
चालकरहित विमाने
आरक्यू-११ रेव्हन अमेरिकाटेहळणी आरक्यू-११बी ७२[]
बेरक्तार टीबी२ तुर्किये चालकरहित लढाऊ विमान []४८ मागणीवर[]

निवृत्त

पूर्वी युक्रेनी वायुसेनेने मिग-२१, मिग-२३, मिग-२७, सुखॉई एसयू-१५, सुखॉई एसयू-१७, याकोलेव्ह याक-२८, तुपोलेव्ह टीयू-१६०, तुपोलेव्ह टीयू-९५, तुपोलेव्ह टीयू-२२एम, तुपोलेव्ह टीयू-२२, तुपोलेव्ह टीयू-१६, तुपोलेव्ह टीयू-१५४ आणि तुपोलेव्ह टीयू-१३४ प्रकारची विमाने वापरली आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Military Balance in Europe 2011", The Military Balance, 111: 73–172, 7 March 2011, doi:10.1080/04597222.2011.559835, S2CID 219628702
  2. ^ Trendafilovski, Vladimir (March 2006). "Ukrainian Reforms". Air Forces Monthly (216): 32–39.
  3. ^ Air Forces Monthly, December 2007 issue, p. 64.
  4. ^ a b c d e f g h i j k "World Air Forces 2022". Flightglobal Insight. 2022. 14 December 2021 रोजी पाहिले.
  5. ^ AirForces Monthly. Stamford, Lincolnshire, England: Key Publishing Ltd. September 2016. p. 37.
  6. ^ a b "Ukrayna 48 adet Bayraktar TB2 SİHA tedarik etmek istiyor" (Turkish भाषेत). October 5, 2020. September 13, 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "World Military Aircraft Inventory", Aerospace Source Book 2007, Aviation Week & Space Technology, 15 January 2007.