Jump to content

युक्तेश्वर गिरी

युक्तेश्वर गिरी

युक्तेश्वर गिरी (श्रीयुक्तेश्वर असेही लेखन) (बंगाली : শ্রী যুক্তেশ্বর গিরী)(मे १०, इ.स. १८५५ - मार्च ९, इ.स. १९३६) हे प्रियनाथ कारार (बंगाली : প্রিয়নাথ কাঁড়ার) यांचे आध्यात्मिक जीवनातील नाव आहे. ते सत्यानंद गिरी व परमहंस योगानंद यांचे गुरू होते. युक्तेश्वर हे शिक्षक, खगोलविद, ज्योतिषी, योगी आणि भगवद्गीता व बायबलवर श्रद्धा असणारे सत्पुरुष होते. वाराणसीचे लाहिरी महाशय हे युक्तेश्वरांचे गुरू होते. स्वामी परंपरेतील गिरी शाखेचे ते सदस्य होते. योगानंद मुक्तेश्वरांना ज्ञानावतार समजत असत.[]


संदर्भ व नोंदी

  1. ^ Yogananda, Paramahansa (1997). Autobiography of a Yogi, 1997 Anniversary Edition p. 383. Self-Realization Fellowship (Founded by Yogananda) http://www.yogananda-srf.org/, Chapter 35, p.383.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत