युकातान
युकातान Yucatán | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
युकातानचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | मेरिदा | ||
क्षेत्रफळ | ३९,६१२ चौ. किमी (१५,२९४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १९,५५,५७७ | ||
घनता | ४९ /चौ. किमी (१३० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-YUC | ||
संकेतस्थळ | http://www.yucatan.gob.mx |
युकातान (संपूर्ण नाव: युकातानचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Yucatán)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या युकातानच्या उत्तरेस मेक्सिकोचे आखात तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मेरिदा ही युकातानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या युकातानध्ये चिचेन इत्सा व माया संस्कृतीमधील इतर अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.
भूगोल
मेक्सिकोच्या आग्नेय भागात ३९,६१२ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २०व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील लोकवस्ती तुरळक आहे.