युएफा यूरो १९९२
स्पर्धा माहिती | |
---|---|
यजमान देश | स्वीडन |
तारखा | १० जून – २६ जून |
संघ संख्या | ८ |
स्थळ | ४ (४ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | डेन्मार्क (१ वेळा) |
उपविजेता | जर्मनी |
इतर माहिती | |
एकूण सामने | १५ |
एकूण गोल | ३२ (२.१३ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ४,३०,१११ (२८,६७४ प्रति सामना) |
← १९८८ १९९६ → | |
युएफा यूरो १९९२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. स्वीडन देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात डेन्मार्कने जर्मनीला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.
पात्र संघ
- सी.आय.एस. ( सोव्हियेत संघच्या ऐवजी)
- डेन्मार्क ( युगोस्लाव्हियाच्या ऐवजी)[१])
- इंग्लंड
- फ्रान्स
- जर्मनी (एकत्रित देशाची पहिली स्पर्धा)
- नेदरलँड्स
- स्कॉटलंड (पहिली स्पर्धा)
- स्वीडन (यजमान, पहिली स्पर्धा)
स्पर्धेचे स्वरूप
आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.
यजमान शहरे
खालील चार स्वीडिश शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.
योहतेबोर्य | स्टॉकहोम | माल्म | नॉरक्योपिंग |
---|---|---|---|
बाद फेरी
उपांत्य सामने | अंतिम सामना | ||||||
२१ जून – स्टॉकहोम | |||||||
स्वीडन | २ | ||||||
जर्मनी | ३ | ||||||
२६ जून – योहतेबोर्य | |||||||
जर्मनी | ० | ||||||
डेन्मार्क | २ | ||||||
२२ जून – योहतेबोर्य | |||||||
नेदरलँड्स | २ (४) | ||||||
डेन्मार्क (पेशू) | २ (५) |
संदर्भ
- ^ "United Nations Security Council Resolution 757 (Implementing Trade Embargo on Yugoslavia)". University of Minnesota Human Rights Center. 18 August 2008 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत