Jump to content

युएफा यूरो १९८४

युएफा यूरो १९८४
UEFA Championnat Européen de Football
France 1984
स्पर्धा माहिती
यजमान देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
तारखा १२ जून – २७ जून
संघ संख्या
स्थळ ७ (७ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताफ्रान्सचा ध्वज फ्रान्स (१ वेळा)
उपविजेतास्पेनचा ध्वज स्पेन
इतर माहिती
एकूण सामने १५
एकूण गोल ४१ (२.७३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ५,९७,६३९ (३९,८४३ प्रति सामना)
सर्वाधिक गोलफ्रान्स मिशेल प्लाटिनी (९ गोल)

युएफा यूरो १९८४ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची सातवी आवृत्ती होती. फ्रान्स देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने स्पेनला २-१ असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ

  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (यजमान)
  • पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
  • रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
  • पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी

स्पर्धेचे स्वरूप

युएफाने ह्या स्पर्धेपासून नवी साखळी पद्धत वापरणे सुरू केले. आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अनावश्यक असल्याच्या सर्वसाधारण मतानुसार तो सामना रद्द करण्यात आला.

यजमान शहरे

खालील सात फ्रेंच शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

पॅरिसमार्सेलल्योंसेंत-एत्येन
लेंसनॉंत स्त्रासबुर्ग

बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२३ जून – मार्सेल
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (एटा)  
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  
 
२७ जून – पॅरिस
     फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
   स्पेनचा ध्वज स्पेन
२४ जून – ल्यों
 स्पेनचा ध्वज स्पेन (पेशू) १ (५)
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १ (४)  


बाह्य दुवे