याह्या जामेह
याह्या जामेह يحيى جامع | |
गांबियाचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २२ जुलै, इ.स. १९९४ – १९ जानेवारी, इ.स. २०१७ | |
मागील | दाव्दा जावारा |
---|---|
पुढील | अडामा बॅरो |
जन्म | २५ मे, १९६५ कनिलै, गांबिया |
याह्या जामेह (अरबी: يحيى جامع; २५ मे १९६५) हा आफ्रिकेतील गांबिया देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ साली एक लष्करी अधिकारी असलेल्या जामेहने रक्तहीन बंडानंतर घडलेल्या सत्तांतरात राष्ट्राध्यक्षपद मिळवले. त्याने १९९६, २००१, २००६ व २०११ सालच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली होती.
२०१६ च्या निवडणुकांमध्ये जामेहला अडामा बॅरोने हरविले. पराभव मान्य केल्यानंतर ९ डिसेंबर, २०१६ रोजी जामेहने निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला. १९ जानेवारी, २०१७ रोजी बॅरोने डकारमधील गांबियाच्या वकीलातीत राष्ट्राध्यक्षपदाची शपध घेतली. आफ्रिकेतील मध्यस्थांशा झालेल्या वाटाघाटींनंतर २१ जानेवारी रोजी जामेहने आपण राष्ट्रप्रमुखपदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले व २२ जानेवारीला तो विषुववृत्तीय गिनीमध्ये आश्रयास गेला.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2002-01-06 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत