Jump to content

यशवंत सदाशिव मिराशी

यशवंत सदाशिव मिराशी उर्फ मिराशी बुवा (इ.स. १८८३ - ५ जानेवारी, इ.स. १९६६) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत.

त्यांनी पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. ते एक उत्तम अभिनेते होते व अनेक संगीत नाटकांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाही केल्या. ते गायनात त्यांच्या वेगवान तानांसाठी प्रसिद्ध होते.

शिष्य

त्यांच्या शिष्यांमध्ये पं. विनायकबुवा उत्तूरकर, पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर व यशवंतबुवा जोशी यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

पुरस्कार व सन्मान

त्यांना इ.स. १९६१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.