Jump to content

यशवंतराव सावंत

यशवंतराव सावंत हे जेजुरी येथील लोकप्रिय मराठी कवी असून, रानवारा, कुणबावा, म-हाटमोळा हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह आहेत. यशवंतराव सावंत यांनी पन्नास वर्षे कविता लेखन केले. छंदोबद्ध कविता लेखनाकडे त्यांचा कटाक्ष होता. साहित्य मार्तंड या नावाने ते ओळखले जात. जेजुरी सावंतखास म्हणूनही त्यांची ओळख होती. त्याना शिकारीचा छंद होता. नेपाळी टोपी आणि दाढी उभट चेहरा व कणखर बाणा असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. यशवंतराव सावंत हे इतिहासाचे अभ्यासक व परखड मत मांडणारे साक्षेपी समिक्षक होते.[ संदर्भ हवा ]