Jump to content

यशवंतराव थोरात

यशवंतराव थोरात
सेनाखासखेल
कोल्हापूरच्या छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचे सेनाखासखेल
अधिकारकाळ१७१७ - १७१९
पूर्ण नावयशवंतराव सुभानजी थोरात
जन्म१६८८ (तारीख अनिश्चित)
(जन्मस्थान अनिश्चित)
मृत्यूजून १७१९
आप्टी, पन्हाळा किल्ला, महाराष्ट्र
उत्तराधिकारीउदाजी थोरात (धाकटा भाऊ)
वडीलसुभानजी थोरात
पत्नीगोडाबाई
राजघराणेथोरात

यशवंतराव थोरात किंवा येसाजी (१६८८-१७१९) हा कोल्हापूरकर छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचा सेनाखासखेल आणि प्रमुख आधारस्तंभापैकी एक होता. छत्रपती संभाजींनी त्याच्या शौर्यासाठी त्याला 'सेनाखासखेल' हा किताब दिला. यशवंतराव थोरात हा वारणा खो-यातला एक पिढीजात वतनदार होता. तो त्याच्या पदरी स्वतंत्र फौज बाळगून होता. छत्रपती संभाजींनी त्याला विजापूर प्रांतात ९ लक्ष उत्पन्नाचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्याने आष्टा या ठाण्याला आपल्या कामकाजाचे मुख्यालय बनवले. १७१७-१७१९सालच्या दरम्यान त्याने उदाजी चव्हाण यांच्या बरोबर मिळून विजापूर प्रांतात स्वाऱ्या केल्या. जून १७१९मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवा याच्या विरुद्ध लढताना‌ पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झालेल्या लढाईत यशवंतरावाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू पश्चात त्याची पत्नी गोडाबाई ही सती गेली. इतिहासात ही लढाई 'पन्हाळ्याची लढाई' म्हणून ओळखली जाते.

सुरुवातीचा काळ

संदर्भ