Jump to content

यमुनाबाई तांबे


चिमणाबाईंचा जन्म १८३५ मध्ये झाशी तालुक्यातील चिरगावच्या गुरसराय येथील शिवराम खानवलकर यांच्या घरी झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. चिमणाबाईंना प्रेमाने चिमाबाई म्हणत. त्या राणी लक्ष्मीबाईंपेक्षा दोन-तीन महिन्यांनी मोठ्या होत्या. चिमणाबाई अतिशय विनम्र आणि शांत गृहिणी होत्या. राणी लक्ष्मीबाई आणि राजा गंगाधरराव यांच्या लग्नाच्या वेळी ती तिचे वडील शिवराम खानवलकर यांच्यासोबत झाशीला आल्या होत्या.

१८४२ मध्ये जेव्हा मणिकर्णिका यांचे झाशीचे राजा महाराज गंगाधर राव यांच्याशी लग्न झाले तेव्हा मोरोपंत एकटे पडले. महाराजांनी मोरोपंतांना झाशीच्या मुरली मनोहर मंदिरात पुजारी म्हणून नेमले आणि ते मंदिराजवळच्या घरात राहू लागले. यावेळी मोरोपंत तांबे हे ३२ वर्षांचे होते. मोरोपंतांच्या एकाकीपणामुळे राजा आणि राणीने मोरोपंतजींचे दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. १८४२ मध्येच मोरोपंत तांबे यांचा विवाह झाशी तहसीलच्या गुरसराय गावातील शिवराम खानवलकर यांच्या कन्या चिमणाबाई खानवलकर यांच्याशी झाला. लग्नानंतर चिमणाबाईचे नाव यमुनाबाई ठेवण्यात आले. पण मोरोपंत तिला प्रेमाने चिमाबाई म्हणत.

राणी लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई यांच्यात आई-मुली आणि मैत्रिणीसारखे गोड नाते होते. यमुनाबाई राणी लक्ष्मीबाईंना इतर मंत्र्यांप्रमाणे बाईसाहेब म्हणत असत. यमुनाबाई झाशीच्या राणीच्या आई होत्या. त्यामुळे झाशीत ‘आईसाहेब श्रीमंत यमुनाबाईसाहेब’ या नावाने प्रसिद्ध होते. लोक त्यांना आईसाहेब म्हणायचे. झाशीच्या मुरली मनोहर मंदिरात यमुनाबाई मोरोपंतांसोबत मंदिरात राहत असत. हे मंदिर किंवा जवळचा भाग एकेकाळी महाराणी सखुबाई यांचे महाल होते. त्या कृष्णभक्त होत्या. १८५१ मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गरोदर राहिल्या तेव्हा यमुनाबाईंनी त्यांची विशेष काळजी घेतली. पण राणींचा मुलगा दामोदर राव वयाच्या सहा महिन्यांत मरण पावला.

(दरम्यान, हे समोर आले की... यमुनाबाईंच्या म्हणण्यानुसार, १८५० मध्ये, आग्राहून आलेल्या एका राजपूत चित्रकाराने महाराज गंगाधर राव यांच्या परवानगीने हस्तिदंतीच्या पटलावर राणी लक्ष्मीबाईचे वधूच्या पोशाखात राजपूत शैलीचे चित्र बनवले होते.)

महाराज गंगाधररावांच्या मृत्यूनंतर यमुनाबाई पती मोरोपंत यांच्यासोबत झाशीच्या राजवाड्यात राहू लागल्या. राणी लक्ष्मीबाईंनी त्यांचे वडील मोरोपंत तांबे यांना झाशी दरबाराचे मंत्रीपद दिले. राणी राजदरबारात जात असताना यमुनाबाई त्यांच्या दत्तक मुलगा दामोदर राव यांची काळजी घेत असे. काही काळानंतर १८५७ चा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. त्यावेळी राणी अनेकदा युद्धात व्यस्त असायच्या. त्यावेळी यमुनाबाई कधी दामोदररावांची काळजी घेत असे तर कधी जखमी सैनिकांवर उपचार करीत असत. राणीच्या गैरहजेरीत त्या स्वतः पती मोरोपंत यांच्यासह प्रजेचा कारभार पाहत असे. यमुनाबाईंनी राणी लक्ष्मीबाईंना राजेशाही कर्तव्ये पार पाडताना आणि रणांगणात लढतानाही पाहिले आहे.

यमुनाबाईंना एक मुलगी होती. तिच्या जन्मानंतर काही महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. १८५२ मध्ये यमुनाबाईंना दुसरी मुलगी झाली. तिचे नाव गोपिकाबाई होते. १८५७ मध्ये, गोपिकाबाईंचा विवाह झाशी जालौनजवळील चुरखी गावातील रहिवासी नारायण राव खेर यांच्याशी झाला. राणीने तिची सावत्र बहीण गोपिकाबाई हिला दागिने भेट दिले होते. आणि मेहुणे म्हणजेच नारायण राव यांना एक राजेशाही वस्र आणि कटट्यार भेट दिली. गोपिकाबाईंना दोन मुलगे आणि एक मुलगी होती. रघुनाथराव, शिवराव आणि सखुबाई.

(( १८५७ च्या नोव्हेंबर महिन्यात आग्राहून आलेल्या एका चित्रकाराने राणी लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई यांची पाच चित्रे काढली होती. ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाई दामोदरसह घोड्यावर, दामोदर आणि यमुनाबाई गीता वाचतानाचे चित्र, आई-वडील, भाऊ-बहीण आणि नर्तकीचे चित्र बनवले होते.))

झाशी येथे यमुनाबाईंना १२ मार्च १८५६ रोजी एक मुलगा झाला. ज्याला स्वतः राणी लक्ष्मीबाईंनी चिंतामणी असे नाव ठेवले होते. महाराणी लक्ष्मीबाईंनी संपूर्ण झाशीत मिठाई वाटली. तसेच चिंतामणीसाठी राज्य परिचारिका आणि अंगरक्षकाची व्यवस्था केली. राणीचे चिंतामणीवर खूप प्रेम होते. पण युद्ध वेगाने चालू होते. झाशी आता हाताबाहेर जात होती. राणी लक्ष्मीबाईंनी जबाबदारी सर्वांवर सोपवली होती. महाराणी लक्ष्मीबाईंचे वडील श्री मोरोपंत तांबे हे ही आपल्या मुलीसोबत युद्धात लढले. यमुनाबाई मोरोपंतांना म्हणाल्या... "माझी जबाबदारी काय?" यावर मोरोपंत म्हणाले... "तुझा आणि माझा मार्ग वेगळा आहे. मी माझ्या मुलीसोबत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहे. तू तुझ्या माहेरच्या घरी जा."

३ एप्रिल १८५८ रोजी इंग्रजांनी झाशीला चारही बाजूंनी वेढा घातला. राणीने झाशीच्या लोकांना आणि तिच्या आईला गुप्त मार्गाने किल्ल्यावरून सुखरूप बाहेर काढले. निघण्यापूर्वी यमुनाबाईंनी आपली मुलगी राणी लक्ष्मीबाईंची शेवटची भेट घेतली. राणी लक्ष्मीबाईंनी मोठ्या भावनेने आपली आई आणि भाऊ चिंतामणी यांचा निरोप घेतला. ४ एप्रिलच्या रात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या दत्तक मुलासह सारंगी घोडीवरून गडावरून उडी मारून काल्पीला गेल्या. लढताना मोरोपंतांच्या पायाला गोळी लागली. त्यांचा पाय कापला गेला. पाय कापल्यानंतरही ते गप्प बसले नाही. आपल्या मुलीने पेटवलेली क्रांतीची ज्योत पेटवत राहिले. यमुनाबाई आपल्या पतीच्या लांबच्या भावाची पत्नी काकूबाई हिच्यासह गुप्त मार्गाने गडाबाहेर गेल्या. जखमी लोकं वाटेत दयनीयपणे रडत होते. सुंदर घोडे मेलेले पडले होते. आजूबाजूला घरे जळत होती. झाशीत विध्वंस झाला होता. दरम्यान, यमुनाबाई प्रथम मुरली मनोहर मंदिराजवळील त्यांच्या घरी गेल्या. घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. सर्व पितळी भांडी, सोने-चांदी चोरीला गेली.

यमुनाबाई काकूबाईंसोबत झाशीच्या सीमेवर पोहोचल्या. मात्र सीमा गेट बंद होते. ह्यू रोज शहराचे सर्व दरवाजे बंद करून दहशत निर्माण करत होता. त्यानंतर यमुनाबाईंनी त्यांची मुलगी राणी लक्ष्मीबाईंचे रूप धारण केले. चिंतामणीला पाठीवर बांधून त्यांनी शहराच्या तटबंदीवरून पलीकडे उडी मारली. त्याने काकूबाईंनाही तटबंदीवरून खाली आणले. आणि त्या गुरसराँय येथील त्यांच्या घरी गेल्या. यमुनाबाई रात्री घरोघरी जाऊन आपल्या मुलासाठी खाण्यापिण्याची मागणी करत असत. गावकरी गुपचूप यमुनाबाईंना मातीच्या मडक्यात खाण्यापिण्याचे पदार्थ देत असत. किती विडंबनात्मक आहे की... एक काळ असा होता की यमुनाबाई झाशी संस्थानच्या राजवाड्यात आईसाहेब नावाने राहत होत्या. आज त्यांना धान्यासाठी घरोघरी जावे लागत आहे. असे करत ४० मैलांचे अंतर कापून यमुनाबाई आपल्या माहेरच्या घरी गुरसराँय पोहोचल्या. त्या काही दिवस त्यांच्या माहेरच्या घरी राहिल्या. त्यांचे वडील शिवराम भाऊ यांना यमुनाबाई अर्थात चिमनाबाईंची काळजी वाटत होती.

काही काळानंतर यमुनाबाईंना पती मोरोपंत यांना फाशी झाल्याची बातमी मिळाली. यमुनाबाईंचा या बातमीवर विश्वास बसला नाही. या बातमीची सत्यता जाणून घेण्यासाठी यमुनाबाईंनी काकूबाईंना झाशीला पाठवले. झाशीचा किल्ला सोडताना यमुनाबाईंकडे १५ हजार रुपयांचे दागिने होते. मात्र दागिने सोबत आणल्याने जीव अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी हे दागिने झाशीच्या गरीब भाटे कुटुंबाकडे वारसा म्हणून ठेवले. यमुनाबाईंनी काकूबाईंना दागिने आणण्याची विनंती केली. काकूबाई झाशीला गेल्यावर त्यांना कळले की १९ एप्रिल १८५८ रोजी दतियाच्या राजाने मोरोपंत तांबे यांना कपटाने कैद करून इंग्रजांच्या स्वाधीन केले होते. हॅमिल्टन आणि ह्यू रोज यांनी मोरोपंत तांबे यांना दुपारी दोन वाजता झाशीच्या राजवाड्यासमोरील झोकनबागेत फाशी दिली. यानंतर काकूबाई भाटे कुटुंबाकडे गेल्या आणि दागिने मागू लागल्या. मात्र कुटुंबीयांनी दागिने देण्यास नकार दिला. तेव्हा काकूबाईने इंग्रज सरकारची भीती दाखवून दागिने हिसकावले आणि इंदूरला पळून गेल्या.

मोरोपंतांच्या फाशीची बातमी यमुनाबाईंना इतर लोकांमार्फत मिळाली. यमुनाबाई अत्यंत दुःखी होत्या. वयाच्या २३ व्या वर्षी यमुनाबाई विधवा झाल्या. यमुनाबाईंनी त्यांच्या माहेरी पतीच्या विधीप्रमाणे कार्य केले. त्याचवेळी जून १८५८ मध्ये ग्वाल्हेरमध्ये राणी लक्ष्मीबाईंच्या हौतात्म्याची बातमी यमुनाबाईंना मिळाली. यमुनाबाई अत्यंत दुःखी झाल्या महाराणी लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई यांच्यात आई-मुलगी आणि मित्र-मैत्रिणीचे नाते होते.

१८६४ मध्ये, जेव्हा मुलगा चिंतामणी आठ वर्षांचा झाला. तेव्हा त्याच्या उपनयन सोहळ्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्या झाशीला गेल्या. यमुनाबाई झाशीला आल्याबरोबर झोकनबागेत गेल्या. आणि आपल्या मुलाला सांगितले की तुमचे बाबासाहेब, शूर क्रांतिकारक मोरोपंत तांबे यांना याच बागेत फाशी देण्यात आली होती. ती भाटे कुटुंबाकडे पोहोचताच यमुनाबाईंना कळले की काकूबाई त्यांचे सर्व दागिने घेऊन पळून गेली आहे. यमुनाबाईंना त्यांचे लांबचे नातेवाईक कृष्णाजी तांबे यांनी झाशीत आश्रय दिला होता. तांबे म्हणाले की, माझ्या घरी महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या त्रिरूपातील व महाविष्णूच्या मूर्ती आहेत. मी निपुत्रिक आहे. या देवांच्या पूजेची जबाबदारी तुम्ही घ्या. एके दिवशी यमुनाबाई आपल्या मुलाला घेऊन मुरली मनोहर मंदिराजवळच्या घरी गेल्या. तेवढ्यात मंदिराचा पुजारी बाहेर आला. त्या झाशीच्या आईसाहेब असल्याचे त्याला समजले. आता हे घर त्यांना ब्रिटिश सरकारने दिले होते. त्या सज्जन ब्राह्मण मोरोपंत तांबे आणि बाईसाहेबांवर निष्ठा ठेवून त्यावेळच्या किंमती नुसार घराचे आठ हजार रुपये यमुनाबाईंना दिले.

मुरली मनोहर मंदिर आजही पुजारी पद त्याच पुजाऱ्याच्या वंशजांच्या ताब्यात आहे. जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हेच मंदिर अथवा काही भाग कृष्णभक्त महाराणी सखुबाई यांचे महाल होते.

१८६४ मध्ये झाशी येथे चिंतामणीचा उपनयन सोहळा झाला. त्याच वेळी राणी लक्ष्मीबाईचा दत्तक मुलगा दामोदर राव याच्या लग्नासाठी यमुनाबाईंना इंदूरहून आमंत्रण आले. आणि यमुनाबाई झाशीहून ललितपूर, सागर, रायगड, सिहोर, भोपाळ मार्गे इंदूरला पोहोचल्या. लग्नानंतर यमुनाबाईंना धराळे कुटुंबाच्या मदतीने इंदूरच्या खजुरी बाजारात आश्रय मिळाला.

दरम्यान, १८५८ मध्ये यमुनाबाईचे दागिने चोरून काकूबाई इंदूरला आल्या. इंदूरच्या होळकर राजघराण्याला त्या झाशीच्या राणीची आई असल्याचे सांगून इंदूरमध्ये आश्रय घेतला. झांशी राणीची आई ह्या नात्याने होळकर घराणे काकूबाईंना रोज शीधा पाठवायचे. यमुनाबाईंचे दागिने वगैरे विकून काकूबाईंनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू ती श्रीमंत होत गेली. काकूबाई व्यापारी आणि ग्राहकांशी अनादराने वागायची. ती झाशीच्या राणीची आई होती, त्यामुळे तिची वागणूक सगळ्यांनी सहन केली. कारण लोक अजूनही झाशीच्या राणीचा खूप आदर करतात. त्यानंतर यमुनाबाई काकूबाईंना भेटल्या. काकूबाई लाजेने खजील झाल्या. यमुनाबाईंनी स्वतःची आणि काकूबाईची हकीकत सगळ्यांना सांगितली. राजघराण्यात काकूबाईंविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पण तोपर्यंत काकूबाईंनी आपला धंदा आटोपून पळ काढला होता. बऱ्याच दिवसांनी आरुईच्या तहसीलदारांनी यमुनाबाईंना कळवले की काकूबाईचा मृत्यू झाला आहे.

काही दिवस यमुनाबाई आपला मुलगा चिंतामणीसह डॉ.रमण गोपाळ काणे यांच्या घरी भाड्याने राहायला गेल्या. या काणेंच्या मदतीने चिंतामणीने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. इंदूरचे रहिवासी सर हेन्री डेली यांची सागरचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दिवसांत मुळे कुटुंब इंदूरमध्ये राहत होते. ते श्रीमंत आणि सुशिक्षित होते. चिंतामणीचा विवाह त्याच मुळे कुटुंबातील कन्या सरस्वतीबाईंशी झाला. चिंतामणी आणि सरस्वतीबाईंना एक मुलगा गोविंदराव आणि मुलगी दुर्गाबाई होती.

गोविंदराव तांबे यांचा जन्म १८८१ मध्ये झाला. यमुनाबाई अनेकदा गोविंदराव आणि दुर्गाबाईंना बाईसाहेबांची गोष्ट सांगत असत. यमुनाबाई अनेकदा दुर्गाबाईला म्हणायच्या की... "चल, मी तुझ्या कपाळावर अर्धचंद्राचा टिळक लावते. आमच्या बाईसाहेब लावायच्या तसे." झाशीवाली राणीची गोष्ट आजीकडून ऐकून गोविंदराव खूप भावूक व्हायचे. त्यांचे मन राणीबद्दल आदराने भरून गेले. त्यांनी राणीशी संबंधित सर्व वस्तू आणि कागदपत्रे गोळा केली होती.

१८९७ मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मातुश्री आईसाहेब श्रीमंत चिमणाबाईसाहेब तांबे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले.

- प्रसिद्ध लेखिका महाश्वेतादेवी यांच्या "झांसी की रानी" या पुस्तकावर आधारित.