Jump to content

यदु वंश

यदुवंश हा यदु नामक राजापासून सुरू झालेला प्राचीन भारतातील राजवंश होता. यदूचेही बुध-->पुरुरवा-->आयु-->नहुष-->ययाती-->यदु असे पूर्वज होते.

श्रीकृष्ण हा या यदूचा थेट वंशज होता. म्हणून त्याला यादव म्हणतात. क्रोष्टा हा यदूचा मुलगा होता. त्याच्यानंतर अनेक राजे होऊन गेल्यानंतर या वंशात शशबिंदू हा मोठा राजा झाला. त्याच्या बिंदुमती नावाच्या मुलीचा विवाह अयोध्या घराण्यातील मांधाताशी झाला होता.

ज्यामघ हा त्यानंतर यदु वंशातील मोठा राजा होता. हा राजा आपल्या बायकोला घाबरत असे. ही बायको शिवी देशाची राजकुमारी होती म्हणून तिला शैव्या म्हणायचे. ज्यामघ राजाने एकदा स्वतःसाठी दुसरी बायको आणली, पण पहिल्या बायकोच्या भीतीने त्याने तिला आपली सून बनवली.

विदर्भ हा ज्यामघ राजाचा मुलगा. या विदर्भाने महाराष्ट्रात येऊन विदर्भ राज्य स्थापन केले. त्याच्याकडे त्याची मुलगी मागायला अयोध्येतील सगर राजा आला होता. विदर्भाची राजधानी कुंडिनपूर होती

विदर्भप्रमाणाचे यदु वंशातील दाशार्ह, त्रिगर्त, दशार्ण आदी काही राजांनी आपल्याच नावाची स्वतंत्र राज्ये स्थापन केली.