यंत्रमानव
माणसासारखे दिसणारे, आणि मानवी भावना आणि वर्तनाचे अनुकरण करणारे यंत्र याला यन्त्रमानव म्हणतात.
स्वरूप
यात डोळ्यांच्या जागी दोन कॅमेरे बसवले जातात. हे कॅमेरे संगणकाशी जोडलेले असतात. तसेच यामध्ये मायक्रोफोन बसवलेले असतात. त्यांचा वापर करून असिमो यंत्रमानव दिलेल्या ठराविक आज्ञांना उत्तरे देऊ शकतो. तसेच आवाज कोठून आला आहे त्याचे ज्ञानही त्याला होऊ शकते.
बुद्धीमत्ता
यंत्रमानवाला आज्ञावली प्रमाणे बुद्धीमत्ता असते. थोडक्यात यंत्रांची बुद्धिमत्ता म्हणजे मनुष्याने तयार केलेल्या आज्ञावल्या असतात. परंतु नवीन आंतरजाला जोडलेले यंत्रमानव आपली माहिती स्वतःच शोधतील असे विकसित होत आहेत. तसेच आज्ञावली लिहिणाऱ्या आज्ञवल्याही निर्माण होत आहेत. त्यामुळे यंत्रमानवाला आवशयक असलेल्या आज्ञवल्या आपोआप विकसित होत जातील अशी शक्यता आहे. ही बुद्धीमत्ता वापरून लढाई करणारे यंत्रमानव सैनिक विकसित करण्याचा प्रयत्न देशोदेशीचे संरक्षण विभाग व प्रयोगशाळा करत आहेत. यामुळे मानवरहित युद्ध यंत्रणा विकसित होऊ शकेल. हे स्वतः प्रगती करत नाहीत कारण प्रगतीसाठी तर्क आणि उस्फुर्तता या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. त्या यंत्रात नसतात. तसेच यंत्रमानवाला स्वत्वाची जाणीव नसते.
नियमावली
असिमोव्ह या शास्त्रज्ञाने यंत्रमानवांना मानव जातीच्या अधिपत्याखाली ठेवणाऱ्य तीन नियमांची रचना केली. हे नियम असे:
- यंत्रमानव माणसाला इजा करू शकत नाहीत किंवा स्वतः तटस्थ राहून माणसाला इजा होताना पाहूही शकत नाहीत.
- यंत्रमानव माणसाची प्रत्येक आज्ञा पाळतात.
- वरील दोन्ही नियम पाळून यंत्रमानव स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतात.
पुस्तके
- यंत्रमानव व कृत्रिम बुद्धिमत्ता. लेखक : निरंजन घाटे प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
- यंत्रमानव लेखक : अ.पां. देशपांडे