म.भा. चव्हाण
मच्छिंद्र भागाजी चव्हाण हे एक मराठी गझलकार आहेत. त्यांनी गझलांव्यतिरिक्त कविता, पोवाडा, लावणी, अभंग तसेच वगही लिहीलेले आहेत.[१]
गझलसंग्रह
- धर्मशाळा
- वाहवा (या संग्रहात चव्हाण यांनी लिहिलेल्या ५२ गझला आहेत.)
सन्मान आणि पुरस्कार
- अमरावतीला ९ जानेवारी, २०११ रोजी झालेल्या गझलोत्सवाचे अध्यक्षपद.
- २०१३साली खानवडी (पुरंदर तालुका, पुणे जिल्हा) येथे २७ नोव्हेंबरला झालेल्या ६व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- मुंबईच्या यू आर.एल. फाउंडेशनचा २०१५ सालचा गझलगौरव पुरस्कार.
- पुण्याच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्वामी विवेकानंद काव्यपुरस्कार. (१६-९-२०१५)
- पुण्याच्या मदत फाऊंडेशन या साहित्यिक चळवळीतर्फे पहिला प्रतिभा गौरव सन्मान पुरस्कार (१७-१-२०२१)
संदर्भ
- ^ "मनातून सगळेच जातियवादी". Maharashtra Times. 25 मे 2020 रोजी पाहिले.