Jump to content

म्योको

सिंगापूर येथे नांगरलेली म्योको

म्योको (जपानी:妙高) ही जपानच्या शाही आरमाराची क्रुझर होती.

म्योको प्रकारच्या क्रुझरांपैकी ही पहिली नौका असून हिला नीगातामधील माउंट म्योको या पर्वताचे नाव देण्यात आले होते. १९२४-२७ दरम्यान बांधण्यात आलेल्या या क्रुझरने दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागरातील समुद्रातील अनेक महत्त्वाच्या लढायांत भाग घेतला. यांत फिलिपिन्सची लढाई, जावा समुद्राची लढाई, कॉरल समुद्राची लढाई, मिडवेची लढाई आणि लेयटे गल्फची लढाई यांचा समावेश आहे.

युद्धाच्या शेवटी सिंगापूरजवळ दोस्त राष्ट्रांच्या हल्ल्यात म्योकोचे मोठे नुकसान झाले. तेव्हा जपान्यांनी म्योकोला बंदरात नांगरून त्यावर विमानविरोधी तोफा बसवल्या. युद्धानंतर म्योकोला सिंगापूरपासून मलाक्काच्या सामुद्रधुनीपर्यंत ओढत नेण्यात आले व तेथे तिला जलसमाधी देण्यात आली.