मोहन सीताराम द्रविड
डॉ. मोहन सीताराम द्रविड | |
---|---|
जन्म नाव | मोहन सीताराम द्रविड |
जन्म | फेब्रुवारी ८, इ.स. १९४९ |
कार्यक्षेत्र | अभियांत्रिकी, शास्त्रज्ञ, साहित्य |
भाषा | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती | युवंता |
पत्नी | सुरेखा द्रविड |
मोहन सीताराम द्रविड (फेब्रुवारी ८, इ.स. १९४९ - हयात) हा मराठी भाषेतील लेखक आहे.
जीवन
व्ही.जे.टी.आय. मधून यंत्र अभियांत्रिकीची पदवी वयाच्या अठराव्या वर्षी घेतल्यानंतर आणि काही वर्षं नोकरी केल्यानंतर त्याने अमेरिकेस प्रयाण केले. तिथे यंत्र अभियांत्रिकीमध्ये एम.एस. केल्यानंतर अभ्यासाचे क्षेत्र बदलून सैद्धांतिक भौतिकशास्त्रामध्ये पीएच.डी. घेतली.