मोहन रानडे
मोहन रानडे (डिसेंबर २५, इ.स. १९२९:सांगली, महाराष्ट्र - जून २५, इ.स. २०१९) हे गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले मराठी कार्यकर्ते होते.[१]
रानड्यांचा जन्म इ.स. १९२९ साली महाराष्ट्रात सांगली येथे झाला. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी छेडलेल्या मुक्तिसंग्रामातील आझाद गोमंतक दलाचे ते प्रमुख नेते होते. सुरुवातीला व्यक्तिगत पातळीवर व नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले.[२] शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात प्रवेशले. त्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र बंड उभारले. पुढे बेती येथील पोलीस चौकीवर केलेले हल्ल्यात ते जखमी झाले आणि इ.स. १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले. पोर्तुगालात त्यांना २६ वर्षांची सजा फर्मावली गेली.[३] गोव्याच्या मुक्तीनंतर भारत सरकार त्यांची सोडवणूक करु शकेल असते, परंतु भारत सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. अखेर १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर जानेवारी, इ.स. १९६९मध्ये त्यांची सुटका झाली[४][५].
रानड्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर सतीचे वाण (मराठी) व स्ट्रगल अनफिनिश्ड (इंग्लिश), ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा शासनाने गोवा पुरस्कार (इ.स. १९८६), तर भारताच्या केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००१) देऊन गौरवले.
मोहन रानडे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी २५ जून २०१९ रोजी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले.[६]
संदर्भ
- ^ सरदेसाई, मनोहर (१९९७). स्वातंत्र्यपथावर. गोमंतक मराठी अकादमी.
- ^ रानडे, मोहन (१९६९). सतीचे वाण. विमल पब्लिकेशन.
- ^ तावरे, डॉ. स्नेहल (२०१९). २० वी आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद,गोवा- जागतिक स्तरावर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यांचे सांस्कृतिक योगदान. स्नेहवर्धन प्रकाशन.
- ^ त्रिवेणी रंगराजन, अनुराधा मास्कारेन्यास. "डीड्स टू लिव्ह" (इंग्लिश भाषेत). २२ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Goa freedom fighter Mohan Ranade who spent 14 years in Portuguese jail dies in Pune". The New Indian Express. 2021-10-19 रोजी पाहिले.
- ^ "esakal | ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांचे निधन". www.esakal.com. 2021-10-19 रोजी पाहिले.