Jump to content

मोहना सिंग

फ्लाईट लेफ्टनंट
मोहना सिंग जितरवाल
मोहना सिंग
जन्मनाव मोहना सिंग जितरवाल
जन्म २२ जानेवारी, १९९२ (1992-01-22) (वय: ३२)
झुनझुनू, राजस्थान
Allegianceभारत ध्वज भारत
सैन्यशाखाभारतीय वायुसेना
हुद्दा फ्लाईट लेफ्टनंट
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार

मोहना सिंग जितरवाल ह्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत.[][][] त्यांना त्यांच्या दोन सहकारी, भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तिन्ही महिला वैमानिकांना जून २०१६ मध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ तुकडीमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते.[] भारत सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ विभाग उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रथम या तीन महिलांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.[]

मोहना सिंग या खतेहपुरा (झुनझुनू) येथील असून त्यांनी आपले शालेय शिक्षण 'एर फोर्स स्कूल, नवी दिल्ली' येथून पूर्ण केले आहे आणि 'ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, अमृतसर, पंजाब' येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक पूर्ण केले आहे. सिंगचे वडील प्रताप सिंग हे भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आहेत आणि आई मंजू सिंग एक शिक्षिका आहेत.[] सिंग यांना रोलर स्केटिंग आणि बॅडमिंटन यासारख्या खेळांची आवड होती. याचसोबत त्यांना गायन आणि चित्रकलेचा देखील छंद होता.[]

२०२० मधील नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांसह, नरेंद्र मोदी

९ मार्च २०२० रोजी तिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.[][]

कारकीर्द

डावीकडून मोहना सिंग, अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ

जून २०१९ मध्ये, 'हॉक एम.के.१३२' अॅडव्हान्स जेट ट्रेनरवर दिवसा संपूर्णपणे कार्यरत होणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला लढाऊ पायलट बनण्याचा त्यांना मान मिळाला. त्यांनी २०१९ मध्ये एर-टू-एर आणि एर-टू-ग्राउंड फायटिंग मोडमध्ये प्रशिक्षण घेऊन 'हॉक एम.के.१३२' वर ३८० तासांहून अधिक घटनामुक्त उड्डाण पूर्ण केले होते.[१०]

संदर्भ

  1. ^ "Meet The Trio Who Will Be India's First Women Fighter Pilots". NDTV.com. 2017-11-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Latest Current Affairs and News About Bhawana Kanth - Current Affairs Today". currentaffairs.gktoday.in (इंग्रजी भाषेत). 2019-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-20 रोजी पाहिले.
  3. ^ Mohammed, Syed (2016-06-19). "For IAF's first women fighter pilots Mohana Singh, Bhawana Kanth & Avani Chaturvedi, sky is no limit". The Economic Times. 2017-11-20 रोजी पाहिले.
  4. ^ Krishnamoorthy, Suresh (2016-06-18). "First batch of three female fighter pilots commissioned". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2017-11-20 रोजी पाहिले.
  5. ^ "Air Force's First 3 Women Fighter Pilots May Fly Mig-21 Bisons From November". NDTV.com. 2017-11-20 रोजी पाहिले.
  6. ^ "India's First Women Fighter Pilots Get Wings". NDTV.com. 2017-11-20 रोजी पाहिले.
  7. ^ "Supported by parents, Bhawana Kanth to script IAF history, become a fighter pilot". News18. 2017-11-20 रोजी पाहिले.
  8. ^ "Flying MiG-21 Bison matter of pride: Flt Lt Bhawana Kanth". Livemint (इंग्रजी भाषेत). 2020-03-09. 2020-04-10 रोजी पाहिले.
  9. ^ "Keep striving for your dreams with hard work, determination: IAF's women fighter pilots". ANI News (इंग्रजी भाषेत). 2021-03-21 रोजी पाहिले.
  10. ^ "Mohana Singh becomes first woman fighter pilot to fly Hawk advanced jet". New Indian Express. 1 June 2019 रोजी पाहिले.