मोर्णा नदी
मोर्णा नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अकोला, बुलढाणा या जिल्हामधून वाहते. मोर्णा नदीचे उगम स्थान हे पातूर आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील अंदुरा या गावी पूर्णा नदी सोबत मोर्णा नदीचा संगम होतो. या ठिकाणाला मेळ असे म्हणतात तेथे शिव शंकराचे पुरातन मंदिर आहे.