Jump to content

मोरोपंत तांबे

मोरोपंत तांबे हे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वडील होते.[] हे मूळचे रत्‍नागिरीचे होते.

श्रीमंत मोरोपंत यांचा जन्म १८०६ साली महाराष्ट्रात झाला. ते‌ मुळचे रत्‍नागिरीचे भट्ट होय. व्यावसायासाठी ते सातारा येथील धावडशी आणि पुणे येथे आपल्या वडीलांसोबत आले. त्यांचे वडील बळवंतराव‌ कृष्णाजी तांबे (१७४८-१८२३) द्वितीय बाजीरावांचे बंधू श्रीमंत चिमाजी अप्पा पेशव्यांसह पुण्याहून १८१५ साली काशीला आले. मोरोपंताचे धाकटे बंधू सदाशिव तांबे ( १८२२-१८७५) हे ही मोरोपंतासह बिठूरला राहत असे‌.मोरोपंतांचा विवाह दाक्षिणात्य कुटुंब साप्रे यांची कन्या भागिरथीबाईंशी झाला. १८३५ साली मनिकर्णिकाचा जन्म झाल्यावर अवघ्या ४ वर्षांनंतर भागिरथीबाईंचे निधन झाले. आणि १८३८ साली मोरोपंत आपल्या सह कुटुंबासह बिठूरला आले. त्यांची कन्या मणिकर्णिकेचा विवाह झाशी संस्थान अधिपती श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर १८५७ च्या युद्धात व झांशी युद्धात मोरोपंतांनी सहभाग घेतला. परंतु दतिया राजाने त्यांना पकडून ब्रिटिशांना दिले. आणि १९ एप्रिल १८५८ साली झांशीच्या झोकनबागेत मोरोपंताना फाशी दिली. त्यांच्यामागे त्यांचा कुटुंबात राणी लक्ष्मीबाई, पत्नी यमुनाबाई तांबे उर्फ चिमणाबाई खानवलकर चिमनाबाई तांबे आणि पुत्र चिंतामणी तांबे व कन्या गोपिकाबाई खेर होत्या.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Edwardes (1975), p. 115