मोबाईल पेमेंट
मोबाईल पेमेंट ही भ्रमणध्वनी वापरून पैसे चुकते करण्याची पद्धती आहे. यात नगदी चलन, चेक, क्रेडीट कार्ड इत्यादींच्या एवजी पैसे चुकते करण्यासाठी सामान्य मोबाईल फोनचा उपयोग केला जातो. विदेशात ॲपल कंपनी ॲपल पेमेण्टस सुविधा पुरवते. भारतात इ.स. ...... पासून ही सोय उपलब्ध आहे आणि ही सुविधा अगदी साध्यातसाध्या फोनवरही वापरता येते. भारतात National payments corporation of India या सुविधेचे नियमन करते. National payments corporation of India ने अनेक संबधीत products विकसीत केले आहेत. त्यातील २ म्हणजे *९९# आणि IMPS हे प्रमुख प्रॉडक्टस आहेत. नोटा बंदी नंतर मोबाईल पेमेंट मध्ये खूप वाढ झाली आहे.
IMPS
- ९९# हा युनिवर्सल (मराठी?) बँकिंग क्रमांक आहे, तर IMPS (immediate mobile payment service ) ही नावाप्रमाणे मोबाईल वरून पेमेंट करायची सोय आहे.
IMPS मध्ये उपयोग/वापर कर्त्यास फोन बँकेकडे नोंदणी करावा लागतो आणि बँकेकडून MMID घ्यावा लागतो. MMID म्हणजे Mobile Money ID . प्रत्येक खात्याला एक MMID असतो. एक मोबाईल अनेक खात्यांना संलग्न असू शकतो. त्याच बरोबर बँक आपल्याला एक MPIN (Mobile पिन ) देते, हा उपयोगकर्त्याचा मोबईल पासवर्ड असतो. ही तयारी एकदाच करावी लागते. एकदा हे झाले की उपयोगकर्ता भारतात कुठेही असला तरी फक्त मोबाईलचा वापर करून अनेक कामे करू शकतो, जसे बिल भरणे , कोणत्याही गोष्टीसाठी पेमेंट करणे इत्यादी इत्यादी समोरच्याकडे MMID नसला तरी चालते, पैसे चुकते करणारा सरळ त्याच्या बँक खात्यात भरणा करू शकतो. पेमेंट झाल्यावर पैसे चुकते करणाऱ्यास आणि समोरच्याला लगेच पेमेंट confirmationचा SMS येतो.
उपयोग/वापर कर्त्याकडे MPIN असला तरी उपयोग/वापर कर्त्या प्रत्येक transaction (मराठी ?) साठी SMS पाठवुन किंवा *९९# ही सुविधा वापरून one time password (OTP) घ्यावा लागतो . यात उपयोग/वापर कर्त्याची सेन्सेटिव्ह माहिती कुठेही वापरली जात नसल्याने हा प्रकार अंशतः सुरक्षित असू शकतो. या पद्धतीने उपयोग/वापर कर्ता क्रेडीट /डेबिट कार्ड न वापरताही websites वरून खरेदी करू शकतो. वापरकर्ता घरी बसून आयएमपीएसद्वारे सहजपणे आरटीजीएस, एनईएफटी आणि निधी हस्तांतरित करू शकतो.