मोबाईल अॅप
मोबाइल ॲंप हे एक सॉफ्टवेर आहे की जे स्मार्ट फोन आणि टॅब्लेट संगणकावर योग्य त्या आकाराची जुळवणी करून उपयोग करता येतों. अनेक नमुन्यातील तयार करून विक्री केलेले ॲंप म्हणजेच वेब ब्राऊजर, इमेल क्लाईंट, कॅलेंडर, मापपिंग कार्यक्रम. खरेदलेले संगीत, इतर माध्यमे, आणि कितीतरी ॲंप मुळातः संग्रह करून वापरता येतात. मोबाइल किंवा इतरात साठविलेले ॲंप खूप झाले तर ते त्यातून रद्द करण्याचीही अतिशय साधी सरळं व्यवस्था त्यात आहे.
अवलोकन
काही ॲंप मोबाइल उपकरणात बसविलेले नसतात ते ॲंप ॲंपगॅलरीत उपलब्ध असतात. ही सुविधा सन २००८ मध्ये चालू झाली ती म्हणजे ॲपल ॲंप संग्रहालय, गूगल प्ले, विंडोज फोन स्टोर, आणि ब्लॅक बेरी ॲंप वर्ल्ड. काही ॲंप मोफत मिळतात पण बाकी खरेदीच करावे लागतात. सामान्यतः ते मोबाइल उपकरणात इच्छित ठिकाणी डाउनलोड करावे लागतात, पण काही वेळा लॅपटॉपवर आणि मेजवरील संगणकात ते डाउनलोड झालेले असतात. ॲंपचे किमतीचा विचार केला तर २०-३०% किंमत वितरकाकडे राहते आणि बाकी ॲंपचे उत्पादकाकडे जाते.[१] त्यामुळे त्याची किंमत मोबाइल विक्रेत्यावर अवलंबून राहते.
ॲंप हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेरचा सॉर्ट फॉर्म आहे. हा शब्द अतिशय प्रसिद्द आहे. सन २०१० मध्ये अमेरिकन डियलेक्ट सोसायटीने वर्ड ऑफ द इयर असे शब्दाचे वर्णन करून त्यांनी त्यांचे यादीत नोंद केली.[२] तंत्रज्ञान स्तंभ लेखक डेविड पोगुए हे त्यांचे लिखाणात म्हणाले की या नवीन स्मार्ट फोनचे आधुनिक काळातील स्पर्धात्मक स्थितीत वेगळेपण राहावे म्हणून याचे निकनेम ॲंप फोन असावे.
मोबाइल फोन मधून साधारणपने ईमेल, कॅलेंडर, संपर्क, स्टॉक मार्केट, हवामान अंदाज, याची माहिती मिळते. तरीसुद्दा इतर विभागात म्हणजेच टेबलावर संगणकावरील कामकाज करणाऱ्या वर्गात सॉफ्टवेरची फार मोठी मागणी येऊन विकासात्मक बाबीत फार मोठी क्रांती झाली. ॲंपच्या संशोधक आव्हानांच्या भडक्यामुळे ब्लॉग,मासिके,आणि ऑनलाइन समर्पित ॲंप संशोधित सेवाना उधाण आलेले आहे. सन २०१४ मध्ये सरकारने मेडिकल क्षेत्रात नियमनतेसाठी ॲंपचा वापर करण्याचे धोरण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला.[३] काही कंपनी ॲंपचा वापर व्यावसायिक समाधान मिळविण्यासाठी पोहचवितात.
सर्व मोबाइल फोन वापर करणाऱ्यामध्ये मोबाइल ॲंपची प्रचिती, प्रशिद्दी, वाढलेली आहे. याचे उदाहरण म्हणजे मे २०१२ मध्ये या संबंधाने एक गणना केली त्यात तेव्हा लक्षात आले की मोबाइल धारक त्यांचे मोबाईलवर ॲंपचा वापर वेब ब्रौस ४९.८% तर ॲंप वापर ५१.१% करत आहेत.[४]
विकास
ॲंपचा विकास मोबाइल उपकरणाच्या गरजेपोटी फार महत्त्वाचा आहे. मोबाइलचे दिसणे, जलदगती, गरजेची हवी ती माहिती या बाबींचा ॲंप विकास करते आहे. मोबाइल उपकरन बाटरीवर चालते त्यामुळे ते वैयक्तिक संगणकापेक्षा कमी शक्तिमान आहे. शिवाय त्यात स्थळं शोध,चीत्रीकरण करणारा कॅमेरा, संगीत, बातम्या, देश विदेशातील चालू घडामोडी अशा विविध बांबी अंतर्भूत आहेत. याच्या विकासाच्या बांबींचा विचार करताना विकासकाने त्याचे स्क्रीन सजावट, आकार, हार्डवेयर तपशील आणि त्याच्या बाह्य आकाराचा विचार करणे आवश्यक आहे कारण मोबाइल व्यवसाव्यात खूप मोठी स्पर्धा आहे आणि क्षणो क्षणी याच्या सॉफ्टवेर मध्ये या स्पर्धत बदल घडतायेत.
विभागणी
ॲंपची अन्द्रोइड हे गूगल प्ले आणि आयओएस हे ॲंप स्टोर साठी दोन तुल्यबळ संग्राहालये आहेत.
गूगल प्ले
हे आंतरराष्ट्रीय ऑनलाइन सॉफ्टवेर संग्रहालय अन्द्रोइड मोबाइल उपकरणासाठी गूगल यांनी विकशीत केले.[५] याचे उद्घाटन ऑक्टोबर २००८ मध्ये झाले. जुलै २०१३ मध्ये गूगल प्ले संग्रहालयातील असणाऱ्या ५० मिल्लीयन ॲंप मधील उपलब्ध एक मिललियन ॲंप पैकी सरस असे कित्येक ॲंप डाउन लोड केले.
स्टातीसताचे अनुमानानुसार १.४ मिल्लीयन पेक्षाही जास्तं ॲंप फेब्रुवारी २०१५ मध्ये ॲंप कडे संग्रहीत होते.
ॲंप संग्रहालय
आयओएस ॲपलचे ॲंप संग्रहालय हे ॲंपचे प्रथम ॲंप वितरण सेवा केंद्र न्हवते, पण जुलै २००८ मध्ये मोबाइलची रोमहर्षक उत्क्रांती झाली होती. आणि जानेवारी २०११ मध्ये १० बिल्लियन ॲंप डाउन लोड झाले असा अहवाल सादर झाला.[६] सन १९९३ मध्ये नेक्स्ट वर्ल्ड एक्सपो मध्ये जेससे टायलर यांनी स्टीव जॉब्स यांना मुळचे ॲंप संग्रहाचे प्रात्यक्षिक दाखविले होते.[७]
६ जून २०११ रोजी आयओएस वापर करनाऱ्या २०० मिल्लियन ग्राहकासाठी ४२५००० ॲंप्स डाउन लोड केले. सन २०१२ मध्ये ॲपलचे सीईओ टिम कूक यांनी जगातील मोबाइल विकासकांच्या सभेत माहिती दिली की ॲंपचे संग्रहालयात ६५०००० ॲंप्स डाउन लोड करण्यास उपलब्ध आहेत, आणि आजपर्यंत ३० बिल्लियन अप्प् डाउन लोड झालेले आहेत.[८]
इतर संग्रहालय
अमेझोन ॲंप संग्रहालय, ब्लॅक बेरी ओवी (नोकीया) विंडोज संग्रहालय समसंग ॲंप्स इलेक्त्रोंनिक ॲंप व्रापर, एफ ड्रोइड आणि कित्येक ॲंपची संग्रहालये आहेत.
व्यवसाय व्यवस्थापन
मोबाइल ॲप्लिकेशन मॅनेजमेंट (MAM) ही सॉफ्टवेर आणि त्याची व त्यासंबंधाचे होणारे सर्व दुष्परिणाम, धोके , नियोजन, कंट्रोल आणि विकशीत बांबी तसेच व्यावसायिक म्हणजेच ॲंपची सेवा असणारे मोबाईलची व्यवस्थापन यंत्रणा यांची जबाबदारी स्वीकारते. कामकाजातील डावपेच म्हणजे सुरक्षततेसाठी "ब्रिंग यूवर ओन डिवाइस" (BYOD) आणि ॲंप सेवा प्राप्त करा.
संदर्भ
- ^ "विश्लेषक: आयफोन ॲंप मध्ये एक उत्तम भविष्य आहे".
- ^ "अमेरिकन डियलेक्ट सोसायटीने 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून ॲंप शब्दाचे वर्णन केले".
- ^ "मोबाइल वैद्यकीय अनुप्रयोग नियम".
- ^ "अमेरिकन मोबाइल बाजार मधे सॅमसंग आणि ॲंड्रॉइड शीर्ष स्थानावर".
- ^ "ऑनलाइन सॉफ्टवेर संग्रहालय ॲंड्रॉइड मोबाइल उपकरणासाठी गूगल यांनी विकशीत केले".
- ^ "१० अब्ज ॲंप डाउन लोड झाले".
- ^ "इलेक्ट्रॉनिकच्या आठवणी - रिचर्ड करे".
- ^ "ॲंप स्टोअर आकडेवारी: ४०० दशलक्ष खाती, ६५०.००० ॲंप".