मोना चिमोटे
डॉ मोना मिलिंद चिमोटे (जन्म इ.स. १९६७, ऑगस्ट ८) या साचा:संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे मराठीच्या प्राध्यापक आहेत. साहित्य समीक्षक, संशोधक आणि लेखिका म्हणुन त्यांची ओळख आहे.
‘रहस्यकथा या कथाप्रकाराचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावरील शोधप्रबंधासाठी डॉ. चिमोटे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य ही पदवी प्रदान केली आहे.
शिक्षण
डॉ मोना चिमोटे यांचे प्रारंभिक शिक्षण नागपूर येथे झाले. अमरावती विद्यापीठातून त्यांनी पदवी व पद्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
संशोधन
रहस्यकथा या विषयावरती त्यांनी आचार्य पदवीसाठी संशोधन केले. विद्यापीठ अनुदान आयोगासाठी त्यांनी ‘मेळघाटातील आदिवासींचे सांस्कृतिक व वाङ्मयीन संचित’, ‘मराठी विज्ञान कथा’, ‘मराठी विज्ञान कथात्म साहित्याचा समाजावर होणारा परिणाम’ आणि ‘अनुवादीत विज्ञान कथा’ या विषयावरती शोध प्रकल्प सादर केले आहेत.
गंथलेखन
साहित्य समीक्षक, संपादक आणि संशोधक अशी डॉ. चिमोटे यांची ओळख आहे. त्यांचे सात संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांचे अठ्ठाविस शोधनिबंध प्रकाशित आहेत. वर्तमानपत्रातून अडोतीस लेख प्रकाशित आहेत.
संपादित ग्रंथ
मराठी संकेतस्थळांची सूची, युगमुद्रा, अमरावती, २०११
स्वच्छंद, अक्षरमुद्रा, नाशिक, २०१२
अनुकंपा, अक्षरमुद्रा, नाशिक, २०१२
डोहतळ, अक्षरमुद्रा, नाशिक, २०१२
स्नेहदग्ध, अक्षरमुद्रा, नाशिक, २०१२
ओघळांचे नकाशे, अक्षरमुद्रा, नाशिक, २०१२
अनन्यशर, अक्शरमुद्रा, नाशिक २०१३
अर्वाचीन कवींच्या कवितेतील स्त्रीरुपे, पद्मगंधा, पुणे
वाङ्मयीन योगदान
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन अशा विविध साहित्य संमेलनातील चर्चासत्रांमध्ये डॉ. मोना चिमोटे यांनी सहभाग नोंदवला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील साठ चर्चासत्र व परिसंवादांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. नामवंत साहित्यिक व कलावंतांच्या प्रकट मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत.
आकाशवाणी आणि दूरदर्शनवरती विविध चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत.
विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मराठी साहित्य परिषद, मराठी अभ्यास परिषद, विज्ञान साहित्य परिषद, बायजा ट्रस्ट या संस्थांच्या त्या सदस्या आहेत.
संशोधक मार्गदर्शक
डॉ. मोना चिमोटे या साचा:संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फिल. या पदवीसाठी नऊ विद्यार्थ्यांनी तर पीएच डी पदवीसाठी सात विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व साहित्याचे संशोधन केले आहे.