मोदक
मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे.[१] महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो.[२] उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.[३]
अर्थ
मोदक यामध्ये मोद असा शब्द आहे.[४] जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हणले जाते.[५] गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.[६]
उकडीचे मोदक
भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची परंपरा आहे.[७] महाराष्ट्रात कोकण विभागात उकडीचे मोदक या प्रकारास महत्त्व असते. हे मोदक तांदळाच्या पिठापासून केले जातात.
पाककृती- साहित्य- तांदुळाची पिठी, मैदा, मीठ, तेल, सारणासाठी - खोबरे, गूळ, जायफळ पूड इ.[८]
आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन (साधारण पिठीच्या निम्म्या प्रमाणात) ते उकळवतात. उकळी आल्यावर त्यात पिठी, आवश्यक वाटल्यास मैदा आणि किंचित मीठ व तेल घालून एकजीव करतात. गुठळ्या राहू देत नाहीत. हे मिश्रण थंड झाल्यावर मळून घेतात. खोबरे आणि गूळ यांचे सारण शिजवून थंड होऊ देतात. (सुकामेवा किंवा अन्य पौष्टिक पदार्थही या सारणात मिसळता येतात.) पिठाच्या गोळ्याची पारी करून तिला पाकळ्या करतात. पारीच्या आत खोबऱ्याचे सारण भरतात. हा कच्चा मोदक. पाकळ्या बंद करून असे सर्व मोदक भांड्यात किंवा कुकरमध्ये चाळणी ठेवून त्यावर वाफवून घेतात.. मोदकपात्र असल्यास त्याचा वापर करता येतो.[९] हा पदार्थ तुपासह खाण्याची रीत आहे.
तळणीचे मोदक
अनंत चतुर्दशीला किंवा संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करण्याची प्रथा आहे. याचप्रमाणे खव्याचे, सुकामेव्याचे, पुरणाचे सारण भरूनसुद्धा मोदक तयार केले जातात. तळणीच्या मोदकांना उकडीच्या मोदकाला असते तसे सारण करतात. हे सारण काही वेळा सुके खोबरे आणि गूळ यांचेही मिश्रण असते. तांदळाच्या पिठाऐवजी हे मोदक कणकेचे करतात आणि सारण भरून मोदक तयार केल्यावर ते तळून घेतात.[९]
चित्रदालन
- मोदक
- मोदक
- मोदक
- मोदक उभा काप
- मोदक उभा काप
- तळलेले मोदक
- काजू मोदक
- गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- "उकडीचे मोदक पाककृती आणि व्हिडीओ". 2015-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-08 रोजी पाहिले.
- Ukdiche Modak Archived 2021-09-09 at the Wayback Machine.
- खव्याचे मोदक Archived 2013-08-30 at the Wayback Machine.
- आंब्याचे मोदक
- मोदक माहिती[permanent dead link]
- "उकडीचे मोदक प्रकार १". 2014-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-14 रोजी पाहिले.
संदर्भ
- ^ Marathi, TV9 (2021-09-07). "Ganesh Chaturthi 2021 : खास गणेशोत्सवासाठी घरी नारळ आणि गुळापासून बनवलेले मोदक तयार करा, पाहा रेसिपी !". TV9 Marathi. 2021-09-08 रोजी पाहिले.
- ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
- ^ "मिसळ महोत्सवानंतर ठाण्यात भरणार मोदक महोत्सव (१. ८. २०१८)".
- ^ Monier-Williams, Monier (1872). A Sanskrit-English Dictionary: ...with Special Reference to Greek, Latin, Gothic, German, Anglo-saxon... (इंग्रजी भाषेत). Clarendon.
- ^ "संस्कृत-हिंदी शब्दकोश (पवर्ग) - विकिशब्दकोशः". sa.wiktionary.org (संस्कृत भाषेत). 2018-09-08 रोजी पाहिले.
- ^ Kabootar, Kaue Aur Tote (हिंदी भाषेत). Bhartiya Jnanpith. ISBN 9788126313938.
- ^ Guides, Fodor's Travel (2015-03-31). Fodor's Essential India: with Delhi, Rajasthan, Mumbai & Kerala (इंग्रजी भाषेत). Fodor's Travel. ISBN 9781101878682.
- ^ Godbole, Nandita (2014-09-09). A Dozen Ways to Celebrate: Twelve Decadent Feasts for the Culinary Indulgent (इंग्रजी भाषेत). Nandita Godbole. ISBN 9781940957173.
- ^ a b CHANGEDE, RIMAL (2012-08-01). AAJACHA MENU. Mehta Publishing House. ISBN 9788177666922.