Jump to content

मोती बुलासा

मोती बुलासा (जन्मदिनांक अनुपलब्ध - मृत्यू ऑक्टोबर १९००)[] हे मराठीतील एक लेखक होते. त्यांनी लिहिलेला मराठी भाषेची सद्यःस्थिती हा निबंध म्हणजे ब्रिटिश राजवटीपासूनच्या मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास मानण्यात येतो.[]

जीवन

मोती बुलासा ह्यांचा जन्म मारवाडी वाणी कुटुंबात झाला. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण मध्यप्रदेशातील खांडवा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रथम नागपूर येथे आणि नंतर पुणे येथे आले. १८९५ ह्या वर्षी ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले. त्यांनी काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनही केले.[]

मोती बुलासा हे पुण्यात आल्यावर प्रार्थनासमाजाचे सदस्य बनले. त्यांनी आणि विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी १८९८मध्ये एकाच वेळी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. ते प्रार्थनासमाजाचे धडाडीचे आणि तरुण कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते.[]

ब्रिटिश ॲॅंड फॉरेन युनिटेरियन असोशिएशनच्या वतीने इंग्लंडमधील मॅंचेस्टर महाविद्यालयात एकेश्वरवादाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना दोन वर्षे मुदतीची शिष्यवृत्ती मिळाली. परंतु इंग्लंडला बोटीने जात असता १९०० च्या ऑक्टोबर महिन्यात पोर्ट सैद येथील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.[]

मराठी भाषेची सद्यःस्थिती

मोती बुलासा ह्यांनी सुविचारसमागम ह्या नावाचे एक मासिक सुरू केले होते.[] ह्या मासिकातून मे १८९८ ते मार्च १९०० ह्या काळात मराठी भाषेची सद्यःस्थिती ह्या शीर्षकाची एकूण सात लेखांची लेखमाला प्रकाशित झाली.[] ह्या लेखमालेत मोती बुलासा ह्यांनी आधुनिक मराठी वाङ्मयाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. हा आढावा घेताना त्यांनी मराठी वाङ्मयाचा पुढील वाङ्मयप्रकारांनुसार विचार केलेला आढळतो.[]

  1. काव्य
  2. नाट्य
  3. कादंबरी
  4. गद्य (निबंध व वैचारिक)
  5. इतिहास
  6. शास्त्रीय
  7. तत्त्वज्ञान
  8. संकीर्ण

संदर्भनोंदी

  1. ^ a b मोती बुलासा, पान. १४.
  2. ^ मोती बुलासा, पान. १०.
  3. ^ a b मोती बुलासा, पान. १२.
  4. ^ मोती बुलासा, पान. २०.
  5. ^ मोती बुलासा, पान. २२.
  6. ^ मोती बुलासा, पान. ३१.


संदर्भसूची

  • मोती बुलासा. मराठी वाङ्मयाची सद्यःस्थिती.