मोती नदी
मोती नदी / चू नदी 珠江 Zhūjiāng | |
---|---|
क्वांगचौ येथील मोती नदीचे पात्र | |
उगम | उपनद्यांची विविध उगमस्थाने |
मुख | दक्षिण चीन समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | चीन, व्हिएतनाम |
लांबी | २,२०० किमी (१,४०० मैल) |
सरासरी प्रवाह | ९,५०० घन मी/से (३,४०,००० घन फूट/से) |
मोती नदी, म्हणजेच चू नदी (अन्य नावे: चूच्यांग ; चिनी: 珠江 ; फीनयीन: Zhūjiāng ; इंग्लिश: Pearl River, पर्ल रिव्हर ;) हे दक्षिण चीनमधील व्यापक नदीप्रणालीचे नाव आहे. मोती नदी हे नाव सर्वसाधारणतः शी नदी (पश्चिम), पै नदी (उत्तर) व तोंग नदी (पूर्व) नद्यांनी बनलेल्या नदीप्रणालीला उद्देशून वापरले जाते. या नद्या मोती नदी त्रिभुज प्रदेशात येऊन मिळत असल्याने या सर्व नद्या मोती नदीच्या उपनद्या मानल्या जातात. शी नदीच्या उगमापासून लांबी मोजल्यास २,२०० कि.मी. लांबीची मोती नदी यांगत्झे व पीत नद्यांखालोखाल चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरी मोठी नदी आहे. क्वांगतोंग, क्वांग्शी या प्रांतांचा बहुतांश भाग मोती नदीच्या खोऱ्यात येतोच, शिवाय युइन्नान, क्वीचौ, हूनान व च्यांग्शी या चिनी प्रांतांच्या काही भागांमधून व चिनी हद्दीबाहेर व्हिएतनामातूनही तिचा प्रवास घडतो.
बाह्य दुवे
- मोती नदीवरील पर्यटनाची माहिती (इंग्लिश मजकूर)