Jump to content

मोतीचूर लाडू

साहित्य :

कृती : बेसन पीठ चाळून घ्यावे. एका परातीमध्ये बेसन पिठ घ्यावे. त्यामध्ये थोडे थोडे पाणी मिसळून पिठ पातळ माळून घ्यावे. चवीनुसार मीठ टाकले तरी चालेल. पिठ माळून १ तास भिजत ठेवावे. पिठ मऊ भिजल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला मंद आचेवर ठेवून द्यावे. तेल तापल्यानंतर भिजलेले बेसन पिठ शेवग्यामध्ये भरून त्याचे वेढे तेलात तळुन घ्यावेत. तळलेली शेव हाताने बारीक करून घ्यावी किवा तुमच्या आवडीनुसार मिक्सर मध्ये बारीक केली तरी चालेल. बारीक केलेल्या शेवेमध्ये काजू, बदाम, मनुके, जायफळ एकत्र करून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यामध्ये २ ग्लास पाणी गरम क्राय ठेवून त्यामध्ये १ किलो साखर मिसळून घ्यावी. त्याचा पाक होई पर्यत थांबावे व नंतर त्यामध्ये बारीक केलेली शेव मिसळावी. ते मिश्रण घट होई पर्यत हलवत राहावे. ते मिश्रण घट्ट झाले कि लाडू वळायला सुरुवात करावी. तुमचे मऊ लाडू तयार झाले.