Jump to content

मोठे निकोबार

मोठे निकोबार
बंगालच्या उपसागरातील मोठ्या निकोबारचे स्थान

मोठे निकोबार अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील सर्वात दक्षिणेकडचे बेट. भारताचे दक्षिण टोक समजले जाणारे इंदिरा पॉईंट येथे आहे. बेटाचे एकूण क्षेत्रफळ १०४५ किमी वर्ग इतके असून निकोबार द्विपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. कॅंपबेल बे ये येथील सर्वात मोठे गाव आहे. बेटाचा ९८ टक्के भूभाग हा विषवृतीय घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यातील ८५ टक्के मोठे निकोबार बायोस्फोर रिझर्वचा भाग आहे. यात दोन राष्ट्रीय उद्यानांचा समावेश आहे. उत्तरेकडील कॅंपबेल बे राष्ट्रीय उद्यान व दक्षिणे कडील गलाथिया राष्ट्रीय उद्यान.[ संदर्भ हवा ]

बेटाचा बहुतांशी भाग डोंगराळ असून ,माऊंट थ्युलर हे ६४२ मी उंचीचे शिखर सर्वात उंच शिखर आहे. उद्यानाचे हवामान विषववृतीय प्रकाराचे अतिशयउष्ण व दमट आहे. बेटाचा आकार मध्यम असल्याने अनेक बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत. अलेक्झांड्रीया, गलाथिया, डागमार इत्यादी नद्या आहेत.[ संदर्भ हवा ]

बेटावरील दळणवळणाचे जाळे अत्यंत कमी आहे. कॅंपबेल बे ते इंदिरा पॉंईंट पर्यंत त्सुनामी येईपर्यंत रस्ता अस्तित्वात होता. कॅंपबेल बे ते बेटाच्या पश्चिम किनारपट्टीवर जाण्यास एक रस्ता आहे.[ संदर्भ हवा ]

कॅंपबेल बे हे बेटावरील सर्वात मोठे गाव असून साधारणपणे ५००० इतकी लोकसंख्या आहे. कॅंपबेल बे व परीसरात लष्कराने मोठी ठाणी स्थापली आहेत. नौदलाचा तळ व हवाईपट्टी देखील कॅंपबेल बे येथेच् आहे. कॅंपबेल बे ते इंदिरा पॉइंट कडे जाणाऱ्या मार्गावर अनेक गावे लागतात. बहुतेक गावे एकतर त्सुनामी मध्ये नष्ट झालीएत किवा मोठे नुकसान झाले आहे. या गावांमध्ये बहुतांशी भारत सरकारने माजी सैनिकांच्या वसाहती स्थापन केल्या आहेत, त्यांना अत्यंत कमी दरात जमीनी वाटून या बेटावर मानवी वस्ती स्थापण्याचे प्रयत्न केले होते. मुख्य भूमीपासून अतिशय दूर असल्याने येथील जीवन हे कंटाळवाणे व नीरस आहे असे वसाहतीतील लोकांचे म्हणणे आहे.[ संदर्भ हवा ]

२६ डिसेंबर २००४ रोजी बंगालच्या उपसागरात आलेल्या प्रचंड त्सुनामी मुळे येथे प्रचंड नुकसान झाले. मानवी तसेच जंगलांची मोठ्या प्रमाणावर जिवितहानी झाली. प्रत्यक्षदर्शीं कडून तसेच येथे भेट देणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनामीची लाट ही येथे ३५ फुटांपेक्षाही अधिक होती.[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे