मोगादिशू
मोगादिशू Muqdisho مقديشو | |
सोमालिया देशाची राजधानी | |
मोगादिशू | |
देश | सोमालिया |
क्षेत्रफळ | १,६५७ चौ. किमी (६४० चौ. मैल) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १५,५४,००० |
- घनता | ८१७ /चौ. किमी (२,१२० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० |
मोगादिशू (सोमाली: Muqdisho; अरबी: مقديشو) ही पूर्व आफ्रिकेमधील सोमालिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. मोगादिशू शहर आफ्रिकेच्या शिंग प्रदेशातील सोमालियाच्या पूर्व भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या मोगादिशूचे १९९१ पासून चालू असलेल्या सोमाली गृहयुद्धामध्ये मोठे नुकसान झाले. ऑगस्ट २०११ मध्ये अल-शबाब ह्या अतिरेकी संघटनेला मोगादिशूमधून हाकलवून लावण्यात यश मिळाल्यानंतर सोमालिया सरकारने मोगादिशूची झपाट्याने पुनर्बांधणी सुरू केली आहे.
मोगादिशू सोमालियाचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील मोगादिशू पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत