मोगरे
?मोगरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | इगतपुरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
मोगरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.राष्ट्रीय महामार्ग ३ वरील मुंढेगाव या गाव जवळून या गावाला जाण्यासाठी रस्ता आहे. मोगरे येथे म्हसोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे 92 टक्के कोळी महादेव समाज या गावात राहतो. गावची लोकसंख्या ही २२५४ इतकी आहे . मोगरे गाव हे दारणा नदीच्या काठी वसलेले आहे. घोटी शहरापासून १६ किमी अंतरावर आहे.
हवामान
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.