मोईन अली
मोईन मुनीर अली (१८ जून, इ.स. १९८७:बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलंड्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
हा इंग्लंडमध्ये वॉरविकशायर, वूस्टरशायर, दक्षिण आफ्रिकेत माटाबेलेलँड टस्कर्स, बांगलादेशमध्ये दुरोंतो राजशाही, आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोर आणि पाकिस्तानमध्ये मुल्तान सुल्तान्सकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळला आहे.