Jump to content

मॉस्किटो पर्वतरांग

  मॉस्किटो पर्वतरांग
Mosquito Range
मॉस्किटो पर्वतरांग
मॉस्किटो पर्वतरांग
फेरप्लेजवळून दिसणारी मॉस्किटो पर्वतरांग
देशअमेरिका
राज्यकॉलोराडो
सर्वोच्च शिखरमाउंट लिंकन (४,३५३ मी)
लांबी६४ कि.मी. उत्तर-दक्षिण
प्रकारग्रॅनाइट खडक

मॉस्किटो पर्वतरांग अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटी पर्वतरांग आहे. ४,३०० मीटर (१४,०००) फूट उंचीची शिखरे असलेली ही रांग कॉलोराडोच्या साधारण मध्यात ६४ किमी उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. याची शिखररेखा पार्क काउंटी आणि लेक काउंटी यांच्यातील सीमारेखा आहे. या पर्वतरांगेच्या एका बाजूस साउथ प्लॅट नदी तर दुसऱ्या बाजूस आर्कान्सा नदीचा उगम होतो. माउंट लिंकन हे ४,३५४ मीटर उंचीचे शिखर या पर्वतरांगेचा सर्वोच्च बिंदू आहे.