मैत्रीण (संकेतस्थळ)
जगभर विखुरलेल्या मराठी स्त्रियांना जोडणारे, पहिले, खास स्त्रियांसाठीचे मराठी संकेतस्थळ म्हणजेच मैत्रीण.कॉम! 'मराठी स्त्रियांची Online Community…' ही मैत्रीण.कॉमची tagline आहे. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर यांनी 'द्रुपल' या प्रणालीवर आधारित 'मैत्रीण' सुरू केली.[१] स्त्रियांसाठीचा खास असा एक आधारगट, ही मैत्रीण.कॉमची ओळख आहे. याशिवाय सदस्य मैत्रिणींनी लिहिलेल्या कथा, ललित, स्फुट, कविता, पुस्तके, चित्रपट आणि भटकंती विषयक लेखन, अशा विविध साहित्य प्रकारातील लेखनही इथे वाचावयास मिळते.
मैत्रीण.कॉमला आजवर ७० लाखाहून अधिक पेजव्ह्यूज मिळाले आहेत. ह्या वेबसाईटचे ३२,०००+ वाचक आहेत; तर आत्तापर्यंत मैत्रीण.कॉमवर ९६४* मैत्रिणींना सदस्यत्व मिळालेले आहे. मैत्रीणवर भारतातून साहजिकच सर्वात जास्त वाचक/सदस्या येतात; ह्याचबरोबर युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, युनायटेड अरब एमिरेट्स, सिंगापोर, ऑस्ट्रेलिया, जपान, इस्रायेल, जर्मनी, स्वीडन, इंडोनेशिया, बहारेन इत्यादी ठिकाणीही मैत्रीण.कॉमच्या सदस्या/वाचक आहेत.
अधिकृत संकेतस्थळ
मैत्रीण.कॉमची रचना
मैत्रीण.कॉम दोन प्रमुख विभागांमध्ये विभागली आहे : सार्वजनिक विभाग आणि खाजगी विभाग.
पहिल्या, सार्वजनिक विभागात गद्य साहित्य, लेख, ललित, स्फुट, कथा, कविता असे साहित्य प्रकार येतात. या विभागातील लेखन मैत्रीण सदस्यत्व न घेताही वाचता येते. मात्र सार्वजनिक विभागात साहित्य प्रकाशित करण्यासाठी किंवा या लेखनावर प्रतिसाद देण्यासाठी मैत्रीणचे सदस्यत्व घेणे अनिवार्य आहे.
दुसरा खाजगी विभाग, केवळ मैत्रीण सदस्यांसाठीच राखीव असून, या विभागातील लेखन वाचण्यासाठी मैत्रीण.कॉमचे सदस्यत्व घेणे गरजेचे आहे. ह्या विभागात आधारगट, आरोग्य, आहार व पाककृती, गावच्या गप्पा, चर्चा विषय, मातृत्व व पालकत्व, मैत्रीण.कॉमबद्दल, वैचारिक, शिक्षण व करीअर, हलकं-फुलकं हे उपविभाग आहेत.
मैत्रीण.कॉमवरील गोपनीयता
मैत्रीण.कॉम वर केवळ सदस्यनामाद्वारे सहभागी न होता सदस्यांना स्वतःची मूळ ओळख, नाव, राहण्याचा पत्ता ई. देणे अनिवार्य आहे. सदस्यत्वासाठी नवा अर्ज आल्यावर मैत्रीण टीमच्या पडताळणी विभागातून त्या सदस्येला फोनद्वारे संपर्क केला जातो. फोनवरच्या या संभाषणातून मैत्रीण.कॉमची संकल्पना, नियम, येथील खाजगी विभागातील लेखनासंदर्भात वावराचे संकेत हे सर्व नव्या सदस्येला समजावून सांगितले जातात. पडताळणीसाठी काही जुजबी प्रश्न तिला विचारले जाऊ शकतात. यानंतर तिला सदस्यत्व द्यावे की नाही, हा निर्णय मैत्रीण टीम घेते. मैत्रीण.कॉमवर असलेल्या साहीत्य/कंटेंट तसेच इतर सभासद यांची प्रायव्हसी जपणे हे प्रत्येक सदस्येची कर्तव्य व जबाबदारी मानली जाते.
संदर्भ
- ^ भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर यांची मुलाखत सकाळ वृत्तपत्राने गुरुवार, दिनांक ९ मार्च रोजी प्रकाशित केली होती.