Jump to content

मे ८

मे ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२८ वा किंवा लीप वर्षात १२९ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

  • १५४१ - स्पॅनिश शोधक हर्नान्दो दि सोटो मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ पोचला. त्याने या नदीचे नाव रियो दे एस्पिरितु सांतो असे ठेवले.

अठरावे शतक

  • १७९४ - फ्रेंच क्रांतीच्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ ऑंत्वान लेवॉइझियेला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा गिलोटिन वर वध केला गेला.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०२ - मार्टिनिक बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक. सेंट पिएर हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार.
  • १९१२ - पॅरामाऊंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली.
  • १९३२- पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
  • १९३३ - महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू.
  • १९४५ - दुसरे महायुद्ध-युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त.
  • १९४५ - सेटीफची कत्तल - फ्रान्सच्या सैन्याने अल्जीरियात हजारो नागरिकांना ठार मारले.
  • १९६२- पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे रवींद्र भारती विश्वविद्यालयाची स्थापना.
  • १९७३ - अमेरिकेच्या दक्षिण डाकोटा राज्यातील वुन्डेड नी येथील मूळ अमेरिकन व्यक्तिंचा ७१ दिवस चाललेला वेढा बिनशर्त शरणागती नंतर उठला.
  • १९७४ - कॅनडाचे सरकार अल्पमतात येउन कोसळले.
  • १९७४ - रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
  • १९७८ - रेनहोल्ड मेस्नर व त्याचा सहकारी ऑक्सिजनच्या नळकांड्याविना एव्हरेस्टवर पोहोचले.
  • १९८४ - सोवियेत संघाने लॉस एंजेल्समधील तेविसावे ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
  • १९८४ - डेनिस लॉर्टीने कॅनडातील क्वेबेक प्रांताच्या विधानसभेत गोळ्या चालवल्या. ३ ठार. १३ जखमी.
  • १९९७ - चायना सदर्न एरलाइन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान शेंझेन विमानतळावर उतरत असताना कोसळले. ३५ ठार.

एकविसावे शतक

  • २००० : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे.

जन्म

मृत्यू

  • ५३५ - पोप जॉन दुसरा.
  • १२७८ - दुआनझॉॅंग, चीनी सम्राट.
  • १३१९ - हाकोन पाचवा, नॉर्वेचा राजा.
  • १७७३ - अली बे अल-कबीर, इजिप्तचा सुलतान.
  • १७९४ - आंत्वान लेव्हॉइझिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
  • १८१९ - कामेहामेहा, हवाईचा राजा.
  • १८९९ - वासुदेव चाफेकर, भारतीय क्रांतिकारक.
  • १९२० : पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे
  • १९५२ : फॉक्स थियेटरचे संस्थापक विल्यम फॉक्स
  • १९७२ : भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पांडुरंग वामन काणे
  • १९८१ : डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृतज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
  • १९८२ -४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे  
  • १९८४ : रीडर्स डायजेस्टचे सहसंस्थापक लीला बेल वालेस
  • १९९५ : पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी प्रेम भाटिया
  • १९९५ : देवदेवतांची आणि संतांची चित्रे चितारण्यासाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार जि.भी. दीक्षित
  • १९९९ : कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ
  • २००३ : संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे
  • २००३ - ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे
  • २०१३ : धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर
  • २०१४ : जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन 

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक रेडक्रॉस दिन.
  • युरोप विजय दिन.
  • जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन
  • रेड क्रेसेंट दिन
  • वर्धापनदिन : रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता (१९६२)

बाह्य दुवे




मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - (मे महिना)