मे ५
मे ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२५ वा किंवा लीप वर्षात १२६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
तेरावे शतक
- १२६० - कुब्लाई खान मोंगोल सम्राटपदी.
सतरावे शतक
- १६४० - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने संसद बरखास्त केली.
- १६४६ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने स्कॉटलंडच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
- १८०९ - स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तिंना नागरिकत्त्व नाकारले.
- १८३५ - युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
- १८६२ - मेक्सिकोत इग्नासियो झारागोझाच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी फ्रांसच्या सैन्याला पेब्लाच्या लढाईत हरवले. हा दिवस मेक्सिकोत सिंको दि मायो (मेची ५ तारीख) म्हणून साजरा केला जातो..
- १८६५ - ओहायोच्या सिनसिनाटी शहराजवळ अमेरिकेतील पहिल्यांदा रेल्वे लुटण्यात आली.
- १८७७ - अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळास कंटाळून सिटींग बुल या स्थानिक नेत्याने आपली लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
- १८९३ - न्यू यॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.
विसावे शतक
- १९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
- १९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
- १९१६ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर चढाई केली.
- १९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
- १९२५ - अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील डेटन गावातील शाळेत डार्विनचा उत्क्रांतिवाद शिकवल्याबद्दल जॉन स्कोप्स या शिक्षकाला अटक करण्यात आली.
- १९२५ - दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकान्स भाषेला राजभाषेचा दर्जा.
- १९३६ - इटलीचे सैन्य इथियोपियाची राजधानी अदिस अबाबात शिरले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या पदच्युत सरकारची लंडनमध्ये रचना.
- १९४१ - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी अदिस अबाबाला परतला.
- १९४४ - महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - नेदरलँड्स व डेन्मार्कमधील जर्मनीच्या सैन्याने ब्रिटिश व केनेडियन सैन्यासमोर शरणागती पत्करली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - प्रागमध्ये जर्मन सैन्याविरुद्ध उठाव.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - मॉटहाउसेन छळछावणीमधील कैद्यांची सुटका.
- १९५० - भुमिबोल अदुल्यादेज राम नववा या नावाने थायलंडच्या राजेपदी.
- १९५४ - पेराग्वेत लश्करी उठाव. जनरल आल्फ्रेदो स्त्रोसनेरने सत्ता बळकावली.
- १९५५ - पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व.
- १९६१ - ऍलन शेपार्ड अंतराळात जाणारा प्रथम अमेरिकन ठरला.
- १९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
- १९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
- १९८० - ६ दिवस घेराव घातल्यावर ब्रिटिश कमांडोंनी लंडनमधील इराणच्या वकिलातीवर हल्ला चढवला.
- १९९१ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये दंगा.
- १९९४ - सिंगापुरमध्ये दोन मोटारींवर रंग फेकल्याबद्दल मायकेल पी. फे या अमेरिकन नागरिकास छडीने मारण्याची शिक्षा.
- १९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
- १९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
एकविसावे शतक
- २००५ - युनायटेड किंग्डममध्ये निवडणुकी. टोनी ब्लेरच्या पक्षास पुन्हा बहुमत.
जन्म
- ८६७ - उदा, जपानी सम्राट.
- १२१० - आल्फोन्सो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास
- १७४७ - लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८१८ - कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी.
- १९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार
- १९१६ - ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती.
- १९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री
मृत्यू
- १०२८ - आल्फोन्सो पाचवा, कॅस्टिलचा राजा.
- ११९४ - कॅसिमिर दुसरा, पोलंडचा राजा.
- १२१९ - लिओ दुसरा, आर्मेनियाचा राजा.
- १३०९ - चार्ल्स दुसरा, नेपल्सचा राजा.
- १७०५ - लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १८२१ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
- १९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी
- १९२२: छत्रपती राजार्षी शाहू महाराज
- १९४३: गायक नट, गायनगुरू रामकृष्णबुवा वझे
- १९४५- महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे
- १९६२ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - लुडविग एर्हार्ड, जर्मन चान्सेलर.
- १९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा
- १९९५ - मिखाईल बॉट्व्हिनिक, रशियाचा बुद्धिबळपटू.
- १९९६ - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.
- २०००: वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ
- २००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक
- २०१२: भारतीय क्रिकेट खेळाडू सुरेंद्रनाथ
- २०१७- दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ
प्रतिवार्षिक पालन
- 'बालकवी' त्र्यंबक बापुजी ठोंबरे पुण्यतिथी (निसर्ग कवी).
- भारतीय आगमन दिन - गुयाना, १८३८ पासून.
- आंतरराष्ट्रीय सुईण/दाई दिन.
- मुक्ति दिन - डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.
- बाल दिन - जपान, दक्षिण कोरिया.
- सिंको दे मायो - मेक्सिको, अमेरिका.
- शहीद दिन - आल्बेनिया.
- जागतिक हास्य दिन
- युरोप दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)