मे ३१
मे ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५१ वा किंवा लीप वर्षात १५२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
तेरावे शतक
अठरावे शतक
- १७५९ - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया प्रांतात नाटकांवर बंदी.
- १७९० - अमेरिकेत १७९०चा कॉपीराईट कायदा लागू.
एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - सेव्हेन पाईन्सची लढाई.
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.
- १८८४ - जॉन हार्वे केलॉगने कॉर्न फ्लेक्सचा पेटंट मिळवला.
- १८८९ - जॉन्सटाउनचा पूर - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील कॉनेमॉ सरोवरावरचा बांध फुटला. जॉन्सटाउन शहरात ६० फूट पाणी. २,००० ठार.
विसावे शतक
- १९०२ - दुसरे बोअर युद्ध-प्रिटोरियाचा तह - उरलेल्या आफ्रिकानर सैन्याने पराभव मान्य केला व दक्षिण आफ्रिकेवरील ब्रिटिश वर्चस्व कायम झाले.
- १९१० - दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.
- १९१३ - अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.
- १९२१ - अमेरिकेतील तल्सा शहरात वांशिक दंगे. ३९हून अधिक ठार.
- १९२४ - सोवियेत संघाने बाह्य मोंगोलियावरील चीनचे आधिपत्य मान्य केले.
- १९२७ - फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानच्या पाणबुड्यांनी सिडनीवर हल्ला केला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेने इंग्लंडमधील कोव्हेन्ट्री गावावर बॉम्बफेक केली.
- १९५२ - जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर अमेरिकन सैन्यातून निवृत्त.
- १९६१ - दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले.
- १९६२ - वेस्ट इंडीज संघाचे विघटन.
- १९७० - पेरू मध्ये भूकंप. डोंगर कोसळून युंगे गाव नष्ट. ४७,००० ठार.
- १९७४ - यॉम किप्पुर युद्ध इस्रायेल व सिरीयामध्ये तह.
एकविसावे शतक
- २००५ - वॉटरगेट कुभांड - डब्ल्यु. मार्क फेल्टने आपणच डीप थ्रोट नावाने ओळखला जाणारा गुप्त बातमीदार असल्याचे कबूल केले.
जन्म
- १४६९ - मनुएल पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १५५७ - फियोदोर पहिला, रशियाचा झार.
- १६४० - मिकाल विस्नियोवीकी, पोलंडचा राजा.
- १७२५ - अहिल्याबाई होळकर, इंदूरच्या शासक.
- १८५२ - फ्रान्सिस्को मोरेनो, आर्जेन्टिनाचा शोधक.
- १८५७ - पोप पायस अकरावा.
- १८८३ - लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१० - भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
- १९२३ - रैनिये तिसरा, मोनॅकोचा राजा.
- १९२८ - पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३० - क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- १९३१ - जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३५ - जिम बॉल्जर, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- १९३८ - जॉन प्रेस्कॉट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९४३ - ज्यो नेमथ, अमेरिकन 'फूटबॉल'पटू.
- १९६६ - रोशन महानामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १४०८ - आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.
- १४१० - मार्टिन पहिला, अरागॉनचा राजा.
- १७४० - फ्रीडरीक पहिला, प्रशियाचा राजा.
- १७९९ - पिएर लेमॉनिये, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १८७४ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
- १९६२ - एडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी.
- २००२ - सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
- स्वातंत्र्य दिन - दक्षिण आफ्रिका.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)