मे ३०
मे ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५० वा किंवा लीप वर्षात १५१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
- १४३१ - फ्रांसच्या रुआ शहरात जोन ऑफ आर्कला जाळून मृत्यूदंड.
सोळावे शतक
- १५३९ - स्पेनचा शोधक व कॉॅंकिस्तादोर हर्नान्दो दि सोटो ६०० सैनिक घेउन फ्लोरिडात उतरला.
- १५७४ - हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
सतरावे शतक
- १६३५ - प्रागचा तह.
एकोणिसावे शतक
- १८०६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनने द्वंद्वयुद्धात एका व्यक्तीस ठार मारले. त्या माणसाने जॅक्सनच्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप केला होता.
- १८१४ - पॅरिसचा पहिला तह - नेपोलियन बोनापार्टला एल्बा येथे हद्दपारीची शिक्षा.
- १८५४ - अमेरिकेच्या नेब्रास्का व कॅन्सस प्रांतांची रचना.
- १८७६ - ओस्मानी सम्राट अब्दुल अझीझ विरुद्ध उठाव. मुरात पाचव्याने सत्ता हाती घेतली.
- १८८३ - न्यू यॉर्कचा ब्रुकलिन ब्रिज पडणार असल्याची अफवा. चेंगराचेंगरीत १२ ठार.
विसावे शतक
- १९१३ - पहिले बाल्कन युद्ध - लंडनमध्ये तह. आल्बेनियाचे राष्ट्र अस्तित्वात.
- १९२२ - वॉशिंग्टन डी.सी.त लिंकन मेमोरियल खुले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने क्रीट जिंकले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डमच्या १,००० विमानांनी जर्मनीच्या कोलोन शहरावर तुफान बॉम्बफेक केली.
- १९४८ - अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील कोलंबिया नदीची संरक्षक भिंत तुटली. व्हॅनपोर्ट शहर काही मिनिटांत उद्ध्वस्त.
- १९६७ - नायजेरियाच्या बियाफ्रा राज्याने विभक्त होण्याचे ठरविल्यावर यादवी सुरू झाली
- १९७१ - मरिनर ९चे प्रक्षेपण.
- १९७२ - इस्रायेलची राजधानी तेल अवीवमध्ये जॅपनीझ रेड आर्मीने लॉड विमानतळावर २४ व्यक्तींना ठार व ७८ ईतरांना जखमी केले.
- १९९८ - अफगाणिस्तानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ५,००० ठार.
एकविसावे शतक
जन्म
- १०१० - रेनझॉॅंग, चिनी सम्राट.
- १६७२ - पीटर द ग्रेट, रशियाचा झार.
- १८७९ - कॉलिन ब्लाइथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - जॉर्ज हेडली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - बॉब विलिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८० - देवेन्द्र बार्नहार्ट, अमेरिकन संगीतकार.
मृत्यू
- १२५२ - फर्डिनांड तिसरा, कॅस्टिलचा राजा.
- १४३१ - जोन ऑफ आर्क.
- १५७४ - चार्ल्स नववा, फ्रांसचा राजा.
- १५७६ - हरादा नाओमासा, जपानी सामुराई.
- १७४४ - अलेक्झांडर पोप, इंग्लिश लेखक.
- १७७८ - व्होल्तेर, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९१२ - विल्बर राइट, विमानाच्या संशोधक राइट बंधूंपैकी एक.
- १९४१ - प्रजाधिपोक तथा राम सातवा, थायलंडचा राजा.
- १९५० - देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक.
- १९६० - बोरिस पास्तरनाक, रशियन लेखक.
- १९६१ - रफायेल लिओनिदास त्रुहियो, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा हुकुमशहा.
- १९६८ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
- १९८१ - झिया उर रहमान, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)