Jump to content

मे ३

मे ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२३ वा किंवा लीप वर्षात १२४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

पंधरावे शतक

अठरावे शतक

  • १७१५ - उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसले.
  • १७९१ - पोलंडने मे संविधान अंगिकारले.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१३ - दादासाहेब फाळके यांचा पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित झाला.
  • १९२८ - जपानच्या सैन्याने चीनच्या जिनान शहरात धुमाकुळ घातला.
  • १९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
  • १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने ल्युबेकच्या अखातात जर्मनीची कॅप आर्कोना, थीलबेक व डॉइचलॅंड ही जहाजे बुडवली.
  • १९४६ - दुसरे महायुद्ध - २८ जपानी सेनाधिकाऱ्यांविरुद्ध टोक्योमध्ये खटला सुरू झाला.
  • १९४७ - जपानने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)ची स्थापना झाली.
  • १९५२ - अमेरिकेच्या जोसेफ ओ. फ्लेचर व विल्यम पी. बेनेडिक्ट या वैमानिकांनी उत्तर ध्रुवावर विमान उतरवले.
  • १९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
  • १९९१ - विंडहोकचा जाहीरनामा प्रकाशित.
  • १९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
  • १९९९ - ओक्लाहोमा सिटी येथे एफ.५ टोर्नेडो. ६६ ठार. ६५२ जखमी १,००,००,००,००० अमेरिकन डॉलरचे नुकसान.
  • १९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.

एकविसावे शतक

  • २००१ - अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीवरील (UNCHR) सदस्यत्व गमावले. १९४७मध्ये समितीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच असे घडले.
  • २००३ - एरवर्क फ्लाइट २३ हे टपाल घेउन जाणारे विमान कोसळले. २ ठार.
  • २००६ - आर्मेनियाचे एरबस ए-३१९ प्रकारचे विमान सोची शहराच्या विमानतळावर वादळात उतरत असताना कोसळले. ११३ ठार.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - मे ५ - (मे महिना)