मे २४
मे २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४४ वा किंवा लीप वर्षात १४५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
तेरावे शतक
- १२१८ - पाचव्या क्रुसेडचे एकरहून इजिप्तकडे प्रयाण.
- १२७६ - मॅग्नस लाडुलास स्वीडनच्या राजेपदी.
सतरावे शतक
- १६२६ - पीटर मिनुईतने मॅनहॅटन विकत घेतले.
- १६८९ - इंग्लंडच्या संसदेने सर्वधर्माच्या व्यक्तिंना समान वागणूक देण्याचा कायदा केला. कॅथोलिक धर्माचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८२२ - पिचिंचाची लढाई - पेरूमध्ये ॲंतोनियो होजे दि सुकरने क्विटो स्वतंत्र केले.
- १८३० - साराह हेलचे मेरी हॅड ए लिटल लॅम्ब ही बालकविता प्रकाशित.
- १८४४ - सॅम्युएल मॉर्स याने तारयंत्र वापरून पहिला संदेश पाठवला.
- १८४६ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल झकॅरी टेलरने मॉॅंन्टेरे जिंकले.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने अलेक्झांड्रिया, व्हर्जिनीया जिंकले.
- १८८३ - १४ वर्षे बांधकाम चालल्यावर न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज वाहतुकीस खुला.
विसावे शतक
- १९०० - दुसरे बोअर युद्ध - युनायटेड किंग्डमने ऑरेंज फ्री स्टेट बळकावले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - इटलीने ऑस्ट्रिया व हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४० - इगॉर सिकॉर्स्कीने सर्वप्रथम हेलिकॉप्टर उडवले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - अटलांटिक समुद्रातील लढाईत जर्मनीच्या युद्धजहाज बिस्मार्कने युनायटेड किंग्डमची मानाची युद्धनौका एच.एम.एस. हूड बुडवली. १,४१५ खलाशी, सैनिक व अधिकारी मृत्युमुखी.
- १९५८ - वृत्तसंस्था युनायटेड प्रेस ईंटरनॅशनलची (यु.पी.आय.) स्थापना.
- १९६८ - पॅरिसमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील शेअरबाजाराला आग लावली.
- १९६८ - कॅनडाच्या क्विबेक सिटीतील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.
- १९७६ - लंडन ते वॉशिंग्टन डी.सी.ला कॉॅंकॉर्ड विमानाची सेवा सुरू.
- १९९१ - इस्रायेलने इथियोपियातील ज्यूंना इस्रायलला नेले.
- १९९३ - एरिट्रियाला इथियोपियापासून स्वातंत्र्य.
- १९९३ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
एकविसावे शतक
- २००० - इस्रायेलने २२ वर्षांनी लेबेनॉनमधून आपले सैनिक काढून घेतले.
- २०२४ - पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनात ७००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म
- १५ - ज्युलियस सीझर जर्मेनिकस, रोमन सेनापती
- १६८६ - गॅब्रियेल फॅरनहाइट, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८१९ - व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.
- १८७० - यानी स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १८९९ - काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी, हिंदू-मुस्लिम ऐक्यवादी बंगाली मुस्लिम कवी.
- १९२४ - रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार.
- १९४२ - अली बाकर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११५३ - डेव्हिड पहिला, स्कॉटलंडचा राजा.
- १३५१ - अबु अल हसन अली, मोरोक्कोचा सुलतान.
- १५४३ - निकोलस कोपर्निकस, आद्य अंतरिक्षशास्त्रज्ञ.
- १९९५ - हॅरोल्ड विल्सन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९९९ - गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.
- २००० - मजरुह सुलतानपुरी, गीतकार व उर्दू शायर.
प्रतिवार्षिक पालन
- बर्म्युडा दिन - बर्म्युडा.
- राष्ट्र दिन - एरिट्रिया.
- बल्गेरियन शिक्षण व संस्कृती दिन - बल्गेरिया.
- स्लोव्हेकियन साहित्य दिन - बल्गेरिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)