मे २२
मे २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४२ वा किंवा लीप वर्षात १४३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
बारावे शतक
चौदावे शतक
- १३७७ - पोप ग्रेगोरी अकराव्याने पाच पोपचे फतवे काढून इंग्लिश तत्त्वज्ञानी जॉन वायक्लिफची मते खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८०७ - अमेरिकेत ज्युरीने भूतपूर्व उपाध्यक्ष एरन बरवर देशद्रोहाचा आरोप ठेवला.
- १८५६ - अमेरिकन काँग्रेसमध्ये गुलामगिरी विरुद्ध भाषण केल्या बद्दल मॅसेच्युसेट्सच्या सेनेटर चार्ल्स सम्नरला दक्षिण कॅरोलिनाच्या सेनेटर प्रेस्टन ब्रूक्सने कॉॅंग्रेसच्या आवारातच छडीने चोप दिला.
- १८७२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रॅंटने अमेरिकन गृहयुद्धात दक्षिणेकडून लढलेल्या वा दक्षिणेबद्दल सहानुभूती असलेल्या ५०० व्यक्तींना माफी जाहीर केली.
विसावे शतक
- १९०६ - अथेन्समध्ये तिसरे ऑलिंपिक खेळ सुरू. काही काळानंतर यांची अधिकृत खेळ म्हणून मान्याता काढून घेण्यात आली.
- १९०६ - राइट बंधूंना त्यांच्या उडणाऱ्या यंत्रासाठी पेटंट देण्यात आला.
- १९१५ - स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन शहराजवळ चार रेल्वे गाड्यांची एकमेकांस धडक. २२७ ठार, २४६ जखमी.
- १९३६ - आयर्लंडची राष्ट्रीय एरलाईन एर लिंगसची स्थापना.
- १९३९ - जर्मनी व इटलीत पोलादी तह.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात पदार्पण केले.
- १९६० - चिली देशात आजतगायत नोंदण्यात आलेला सगळ्यात तीव्र भूकंप झाला. रिश्टर मापनपद्धतीनुसार याची तीव्रता ९.५ होती.
- १९६२ - कॉन्टिनेन्टल एरलाइन्स फ्लाइट ११ या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानात बॉम्बस्फोट. ४५ ठार.
- १९६८ - अमेरिकेची परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. स्कॉर्पियन एझोर्स बेटांजवळ ९९ खलाशी व अधिकाऱ्यांसहित बुडाली.
- १९७२ - श्रीलंकेने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९० - उत्तर यमन व दक्षिण यमन यमनचे प्रजासत्ताक या नावाने एकत्र झाले.
एकविसावे शतक
- २००४ - अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील हलाम या गावात एफ.४ टोर्नेडो. ४ कि.मी. रुंदी असलेल्या या टोर्नेडोने सगळे गाव नेस्तनाबूद केले. आधीच धोक्याची सूचना मिळाल्यामुळे फक्त एक नागरिक ठार.
- २००४ - भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा शपथविधी.
- २००९ - भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा दुसऱ्यांदा शपथविधी.
- २०११ - अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील जॉपलिन शहरात एफ.५ टोर्नेडो. २ कि.मी. रुंदी असलेल्या या टोर्नेडोने अर्धे शहर नेस्तनाबूद केले. वीस मिनिटांपूर्वी धोक्याची सूचना मिळूनही ११६ ठार.
- २०११ - पाकिस्तानच्या कराची शहरातील पी.एन.एस. मेहरान या नाविकी तळावर तालिबान आणि बलूची अतिरेक्यांनी हल्ला चढवला. सोळा सैनिक आणि सहा अतिरेकी ठार. पाकिस्तानच्या अनेक लढाऊ आणि सर्वेक्षक विमानांचे नुकसान.
जन्म
- १६८८ - अलेक्झांडर पोप, इंग्लिश कवी.
- १७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाज संस्थापक.
- १८१३ - रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
- १८५९ - सर आर्थर कोनन डॉयल, इंग्लिश लेखक व डॉक्टर.
- १८७१ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.
- १८७४ - डॅनियेल फ्रांस्वा मलान, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १८७९ - वॉरविक आर्मस्ट्रॉॅंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८५ - टोयोडा सोएमु, जपानी दर्यासारंग.
- १९०७ - सर लॉरेन्स ऑलिव्हिये, इंग्लिश अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक.
- १९४० - इरापल्ली प्रसन्ना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८७ - नोव्हाक जोकोविच, सर्बियाचा टेनिस खेळाडू.
मृत्यू
- ३३७ - कॉन्स्टन्टाईन, रोमन सम्राट.
- १०६८ - गो-राइझाइ, जपानी सम्राट.
- १६६७ - पोप अलेक्झांडर सातवा.
- १८५९ - फर्डिनांड दुसरा, सिसिलीचा राजा.
- १९६६ - टॉम गॉडार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९१ - श्रीपाद अमृत डांगे, भारतीय साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
- २००३ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके भारतीय हृदयरोगतज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्र दिन - यमन.
- जागतिक जैवविविधता दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)