मे २
मे २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२२ वा किंवा लीप वर्षात १२३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५६८ - मेरी स्टुअर्ट लॉक लेवेन तुरुंगातुन पळाली.
एकोणिसावे शतक
- १८०८ - फ्रेंच आक्रमकांविरुद्ध माद्रिदमध्ये जनतेचा उठाव.
- १८२९ - चार्ल्स फ्रीमॅन्टलने ऑस्ट्रेलियातील स्वान रिव्हर वसाहतीची स्थापना केली.
- १८६६ - कॅलावची लढाई - पेरूच्या सैन्याने स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.
- १८७२ - मुंबईत व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमचे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन.
- १८८५ - कट नाईफची लढाई - क्री व एसिनिबॉइन जमातीच्या स्थानिक रहिवाश्यांनी कॅनडाच्या सैन्याचा पराभव केला.
- १८८५ - बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसऱ्याने कॉँगोच्या राष्ट्राची निर्मिती केली.
- १८८९ - इथियोपियाचा सम्राट मेनेलिक दुसऱ्याने इटलीशी संधी केली व एरिट्रिया इटलीच्या हवाली केले.
विसावे शतक
- १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.
- १९१८ - जनरल मोटर्सने डेलावेरमधील शेवरोले मोटर कंपनी विकत घेतली.
- १९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.
- १९२५ : फरीदपूरच्या काँग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली
- १९३३ - जर्मनीत ऍडोल्फ हिटलरने ट्रेड युनियन वर बंदी घातली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - सोवियेत संघाने बर्लिनचा पाडाव केला व जर्मन संसदेवर आपला झेंडा फडकवला.
- १९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले
- १९५३ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - साइगॉनच्या बंदरात अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. कार्ड बुडाली.
- १९६९ - क्वीन एलेझाबेथ सेकंड या राजेशाही जहाजाची पहिली सफर सुरू.
- १९८२ - फॉकलंड युद्ध - युनायटेड किंग्डमच्या एच.एम.एस. कॉँकरर या पाणबुडीने आर्जेन्टिनाची युद्धनौका ए.आर.ए. जनरल बेल्ग्रानो बुडवली.
- १९८९ : ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमा हंगेरीने खुल्या केल्या. त्यामुळे पूर्व जर्मन पश्चिमेला पळून जाऊ लागले. अखेर याची परिणती बर्लिनची भिंत पडण्यात आणि शीतयुद्धाची अखेर होण्यात झाली.
- १९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलीनीकरण झाले.
- १९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
- १९९७ - टोनी ब्लेर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.
- १९९९ - मिरेया मॉस्कोसो पनामाच्या पंतप्रधानपदी. मॉस्कोसो पनामाची सर्वप्रथम स्त्री पंतप्रधान आहे.
- १९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करून ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
एकविसावे शतक
- २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- २००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
- २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अॅबोटाबाद येथे हत्या केली.
- २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
- २०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू
- २०१४ - अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात दोन दरडी कोसळून २,१०० व्यक्ती ठार. इतर शेकडो बेपत्ता.
जन्म
- १३६० - यॉँगल, चीनी सम्राट.
- १७२९ - कॅथेरिन, रशियाची सम्राज्ञी.
- १८९२ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- १८९९ - भालजी पेंढारकर, मराठी चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक.
- १९०३ - डॉ.बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ.
- १९२० - डॉ. वसंतराव देशपांडे, गायक व संगीतकार.
- १९२१ - सत्यजित रे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९२९ - जिग्मे दोरजी वांगचुक, भूतानचा राजा.
- १९३५ - फैसल दुसरा, इराकचा राजा.
- १९६० - रवि रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - ब्रायन लारा, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - डेव्हिड बेकहॅम, इंग्लिश फुटबॉल खेळाडू.
- १९८१ - ले. कर्नल. ए. के. निरंजन, १० इंजिनिअर
मृत्यू
- ७५६ - शोमु, जपानी सम्राट.
- ९०७ - बोरिस पहिला, बल्गेरियाचा राजा.
- १५१९ - लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.
- १६८३ - रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित, राज्यव्यवहारकोश कर्ता.
- १९५७ - जोसेफ मॅककार्थी, अमेरिकन सेनेटर.
- १९६३ - डॉ. के.बी. लेले, मराठी जादूगार.
- १९६९ - फ्रांझ फोन पापेन, जर्मन चान्सेलर.
- १९७२ - जे. एडगर हूवर, अमेरिकेच्या एफ.बी.आय. या पोलीस संस्थेचा संचालक.
- १९७३ - दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.
- १९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.
- १९९८ - पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते.
- १९९९ - मेजर रमण दादा, कीर्ती चक्र विजेता, ११ सिंग रेजिमेंट
- १९९९ - पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.
- २००१ - मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
- २००५ - वी किम वी, सिंगापूरचा राष्ट्राध्यक्ष.
- २०११ - ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
- २०२० - कर्नल आशुतोष शर्मा, १९ गार्ड ब्रिगेड, राष्ट्रीय रायफल्स.
- २०२० - मेजर अनुज सूद, १९ गार्ड ब्रिगेड, राष्ट्रीय रायफल्स.
प्रतिवार्षिक पालन
- ध्वज दिन - पोलंड.
- शिक्षक दिन - ईराण.
- शिक्षण दिन - ईंडोनेशिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मे २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)