Jump to content

मेटॉरसची लढाई

मेटॉरसची लढाई ही दुसरे प्युनिक युद्ध या युद्धातील एक लढाई होती. ही लढाई इ.स.पू. २०७ साली झाली.

इटलीतील मेटॉरो नदीकाठी या लढाईत मार्कस लिव्हियस आणि गैयस क्लॉडियस निरो यांच्या नेतृत्वाखालील रोमच्या सैन्याने कार्थेजच्या सैन्याचा पराभव केला. हॅनिबालचा भाऊ हास्ड्रुबाल बर्का हा कार्थेजचा सेनापती होता.